तुफान धुमाकूळ घालतंय’शिवबाचं गाणं’ (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण रयतेचे आदरस्थान आहेत. (Shivbacha Naav Song) अशा धाडसी, शूर, पराक्रमी जाणता राजाचे स्तुतीपर गाणे तुम्हा पाहिले का? ‘बिग हिट मीडिया’ प्रस्तुत ‘शिवबाचं गाणं’ हे गाणं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. (Shivbacha Naav Song) संबंधित बातम्या – Rakul Preet Wedding : रकुल … The post तुफान धुमाकूळ घालतंय’शिवबाचं गाणं’ (Video) appeared first on पुढारी.
तुफान धुमाकूळ घालतंय’शिवबाचं गाणं’ (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण रयतेचे आदरस्थान आहेत. (Shivbacha Naav Song) अशा धाडसी, शूर, पराक्रमी जाणता राजाचे स्तुतीपर गाणे तुम्हा पाहिले का? ‘बिग हिट मीडिया’ प्रस्तुत ‘शिवबाचं गाणं’ हे गाणं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. (Shivbacha Naav Song)
संबंधित बातम्या –

Rakul Preet Wedding : रकुल प्रीत सिंह -जॅकी भगनानीचे प्री-वेडिंग फोटो व्हायरल
Don 3 Big Announce : रणवीरसोबत कियाराची जोडी! निर्मात्यांची घोषणा
‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची! रमेश वाणी तृतीयपंथी भूमिकेत

सर्व सामान्य प्रजा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मधील अतूट नाते, या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. जबरदस्त नृत्य, पाय थिरकायला लावणारे संगीत, शिवकालीन माहौल अशा अनेक गोष्टींनी सजलेले हे गाणे, अल्पावधीतच प्रसिद्ध झाले आहे. या गाण्यात अंबाबाईचे गोंधळ आहे, ज्या गोंधळाला स्वतः महाराज त्यांच्या पत्नी महाराणी सईबाई सोबत येतात, असा प्रसंग दाखवण्यात आला आहे. हा थरारक गोंधळ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

‘बिग हिट मीडिया’ प्रस्तुत, प्रशांत नाकती यांचे संगीत असलेले ‘शिवबाचं गाणं’ हृतिक अनिल मनी व अनुष्का अविनाश सोलवट यांनी निर्मित केले आहे. या गाण्याच्या निर्मितीसाठी सोमनाथ घारगे (पोलिस अधिक्षक रायगड) आणि श्रीकांत देसाई (एनडी स्टुडिओ) यांचे विषेश सहकार्य लाभले. गायक आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणे यांनी हे गाणे गायले आहे. प्रशांत नाकती व संकेत गुरव यांनी संगीत दिले आहे.

दिग्दर्शन-छायाचित्रण अभिजीत दाणी यांनी केले. कलाकार विशाल फाले, निक शिंदे, रितेश कांबळे, तृप्ती राणे आणि वैष्णवी पाटील यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ‘शिवबाचं गाणं’ या गाण्यात छत्रपती महाराजांच्या भूमिकेत लोकप्रिय मराठमोळा अभिनेता विशाल निकम याला पाहणं रंजक ठरलं. महाराणी सईबाईंच्या भूमिकेतून अनुष्का सोलवट हिने मराठी कला क्षेत्रात पदार्पण केले आहे तर सुभेदार म्हणून अविनाश सोलवट यांनी भूमिका केली आहे. गाण्याचे नृत्य दिग्दर्शन चेतन महाजन (नानू) आणि चेतन शिगवण यांनी केले आहे.
Latest Marathi News तुफान धुमाकूळ घालतंय’शिवबाचं गाणं’ (Video) Brought to You By : Bharat Live News Media.