मराठा समाज मागास असल्याचे सरकारने सिद्ध करावे : संभाजीराजे छत्रपती

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय, निमशासकीय सेवांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे विधेयक आज (दि. २०) विधानसभेपाठोपाठ, विधानपरिषदेतही एकमताने मंजूर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले. या निर्णयावर माजी खासदार आणि स्‍वराज्‍य पक्षाचे संस्‍थापक संभाजीराजे छत्रपती यांनी एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. (On Maratha Reservation) ‘मराठा’ … The post मराठा समाज मागास असल्याचे सरकारने सिद्ध करावे : संभाजीराजे छत्रपती appeared first on पुढारी.

मराठा समाज मागास असल्याचे सरकारने सिद्ध करावे : संभाजीराजे छत्रपती

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय, निमशासकीय सेवांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे विधेयक आज (दि. २०) विधानसभेपाठोपाठ, विधानपरिषदेतही एकमताने मंजूर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले. या निर्णयावर माजी खासदार आणि स्‍वराज्‍य पक्षाचे संस्‍थापक संभाजीराजे छत्रपती यांनी एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. (On Maratha Reservation)
‘मराठा’ मागास सिद्ध करण्यासाठी शासनाने आयोग गठित करावा
संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, “मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो.” (On Maratha Reservation)
आरक्षण लागू केल्याने मुख्यमंत्री आणि राज्य शासनाचे आभार
शासनाने मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक ! अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून हे आरक्षण न्यायालयात टिकविण्याची जबाबदारी देखील शासनाने कटाक्षाने पार पाडावी, अशी मागणी देखील संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. (On Maratha Reservation)

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो.
शासनाने ही मागणी मान्य करत मराठा…
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 20, 2024

हेही वाचा:

Maratha Reservation : विधानपरिषदेतही मराठा आरक्षण विधेयक मंजूर
मराठा आरक्षण विधेयक मंजुरीचे स्‍वागत; पण ओबीसीतून हक्‍काचे आरक्षण मिळविणारच : जरांगे पाटील
CM Eknath Shinde : विधीमंडळ विशेष अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
ब्रेकिंग: मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

Latest Marathi News मराठा समाज मागास असल्याचे सरकारने सिद्ध करावे : संभाजीराजे छत्रपती Brought to You By : Bharat Live News Media.