औषधाच्या कारखान्यात एमडीचे उत्पादन : पोलिस छाप्यात 600 किलो एमडी जप्त

पुणे : कुरकुंभ ता.दौंड औद्योगिक क्षेत्रातील अर्थ केम लॅबोरेटरीज कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला असून केलेल्या कारवाईत पुणे पोलिसांकडून 1100 कोटी रुपयांचे तब्बल 600 किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. औषधाच्या कारखान्यात एमडीचे उत्पादन घेतले जात होते. कुरकुंभ एमआयडीसी येथील कारखान्यात केलेली कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची राज्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असण्याची … The post औषधाच्या कारखान्यात एमडीचे उत्पादन : पोलिस छाप्यात 600 किलो एमडी जप्त appeared first on पुढारी.

औषधाच्या कारखान्यात एमडीचे उत्पादन : पोलिस छाप्यात 600 किलो एमडी जप्त

पुणे : कुरकुंभ ता.दौंड औद्योगिक क्षेत्रातील अर्थ केम लॅबोरेटरीज कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला असून केलेल्या कारवाईत
पुणे पोलिसांकडून 1100 कोटी रुपयांचे तब्बल 600 किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. औषधाच्या कारखान्यात एमडीचे उत्पादन घेतले जात होते. कुरकुंभ एमआयडीसी येथील कारखान्यात केलेली कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची राज्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असण्याची शक्यता आहे. यामध्ये काही मोठ्या केलिकल एक्स्पर्टचा सहभाग असून त्यांना बाहेरच्या राज्यातून ताब्यात घेतले आहे.
नगर जिल्ह्यातील अनिल साबळे नावाच्या व्यक्तीची ही कंपनी असल्याचे समजते आहे. कुरकुंभ येथील कारखाना मालक व केमिकल एक्स्पर्ट पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू. अद्याप कोणतीही अटक केलेली नाही. शहरासह देशभरातील विविध शहरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांची छापेमारी सुरू आहे. अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा

आदिवासी शेतकर्‍यांनी पिकवली सेंद्रिय खतावर स्ट्रॉबेरीची शेती
विकसित जम्मू-काश्मीरसाठी आम्ही शपथबद्ध : PM मोदी
दरोडा टाकण्यापूर्वीच सात दरोडेखोरांना अटक; तडीपार गुंडाचा समावेश

Latest Marathi News औषधाच्या कारखान्यात एमडीचे उत्पादन : पोलिस छाप्यात 600 किलो एमडी जप्त Brought to You By : Bharat Live News Media.