दरोडा टाकण्यापूर्वीच सात दरोडेखोरांना अटक
खालापूर ः Bharat Live News Media वृत्तसेवा : घातक शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात दरडोखरांच्या मुसक्या आवळण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोरांमध्ये अख्तर उस्मान खान (वय 40 वर्षे, रा. ताकई, पो. साजगांव, ता. खालापूर) या रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाचा देखील समावेश असल्याचे पोलीसांनी सांगीतले.
संबंधित बातम्या
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत मिळणारे, टिकणारे आरक्षण मिळेल : मुख्यमंत्री
रायगड : तळोजा कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी
वाहन चोरणार्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेने केले गजाआड
खालापूर तालुक्यात सध्या चोरीचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. परिणामी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त वाढवली आहे. रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास खोपोली विहारी सिध्दार्थनगर जवळील इंडिया स्टील कारखान्याजवळ ब्रिजभूषण रघूनाथ सिंग विज (रा.उत्तरप्रदेश), विजय शालीग्राम यादव (रा. उत्तरप्रदेश), चंद्रमोहन रामचरित्र यादव (रा.बिहार), अख्तर उस्मान खान (मूळ रा.ताकई, ता. खालापूर). अख्तर याचे साथीदार बंटी, निसार अहमद आणि याकुब चौधरी (पूर्ण नाव माहीत नाही, सध्या रा.ताकई, मुळ रा. उत्तरप्रदेश) हे दरोड्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने अत्यंत धाडसाने रंगेहाथ पकडले. दरोडेखोरांकडून लोखंडी पहार, लोखंडी कटावणी, हेक्सो ब्लेड, नट बोल्ट खोलण्याचा पाना, एक सुती दोरी, मिरची पावडर अशी घातक हत्यारे मिळून आले.
पोलिसांनी सात जणांना अटक करत खोपोली पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने हे करीत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीने सर्वत्र कौतुक होत आहे.
Latest Marathi News दरोडा टाकण्यापूर्वीच सात दरोडेखोरांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.