शेतीचे साहित्य चोरट्यांचा सुळसुळाट, पावणे तीन लाखाचा ऐवज लंपास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- एरंडोल जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खळ्यातून शेताच्या बांधावरून अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकल, इलेक्ट्रिक मोटर, पशुधन असे दोन लाख 72 हजार शंभर रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी विविध पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रामनगर येथे राहणाऱ्या शेतकरी विजय प्रेमराज सावळे यांच्या घरासमोरून 45 हजार रुपये किमतीची होंडा … The post शेतीचे साहित्य चोरट्यांचा सुळसुळाट, पावणे तीन लाखाचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

शेतीचे साहित्य चोरट्यांचा सुळसुळाट, पावणे तीन लाखाचा ऐवज लंपास

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- एरंडोल जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खळ्यातून शेताच्या बांधावरून अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकल, इलेक्ट्रिक मोटर, पशुधन असे दोन लाख 72 हजार शंभर रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी विविध पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रामनगर येथे राहणाऱ्या शेतकरी विजय प्रेमराज सावळे यांच्या घरासमोरून 45 हजार रुपये किमतीची होंडा सीबी युनिकॉर्न गाडी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. एरंडोल येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ राहणारे शेतकरी दशरथ बुधा महाजन यांचे नांदगाव शिवारातील शेत गट नंबर 93 पासून जवळ असलेल्या अंजनी धरणाच्या डाव्या कालव्यावर असलेली 17 हजार पाचशे रुपये किमतीची पाण्याची इलेक्ट्रॉनिक मोटर अज्ञात चोराने लांबवली. या प्रकरणी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतातील खळ्यातून अज्ञात चोरट्यांनी चार बैल, दोन केबल, वायरचे बंडल असे एकूण 50 हजार 600 रुपयांचे पशुधन व साहित्य चोरले. या प्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी येथील गोकुळ फुलचंद राजपूत यांच्या वाकडी गावाजवळील खळ्यातून सहा बैल, एक गाय असे एकूण 64 हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथील सागर बंडू ठाकरे या शेतकऱ्याची होंडा कंपनीची 95 हजार रुपये किमतीची मोटरसायकल स्वामी समर्थ केंद्र समोरून अज्ञात चोरट्यांनी लांबवली याप्रकरणी जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हैस, बैलांची अवैध वाहतूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा
जळगाव :  दोन वाहनातून अत्यंत क्रूरपणे म्हैस व बैलांची वाहतूक करताना पोलिसांना मिळून आले. या प्रकरणी जामनेर पोलिसांनी 18 म्हशी, दोन बैल व दोन टाटा पिकअप असे सतरा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जामनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयशर वाहन क्रमांक (एम. एच. 18 बी जी 93 16 ) व (एम एच 04 जी आर 2106) या दोनही वाहनांतून 18 म्हशी व दोन बैलांची वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी दोन वाहनांसह एकूण 17 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जामनेर पोलिसांमध्ये प्राणी अधिनियम नुसार संशयित आरोपी शाहेब खान, कलीम खान राहणार बलखंड जिल्हा खरगोन मध्य प्रदेश), सुनील दुर्योधन गोयल राहणार बलखंड जिल्हा खरगोन मध्य प्रदेश), शेख शाहरुख शेख साजिद राहणार नदी ना. कॉलनी रावेर जिल्हा जळगाव). शेख शोएब शेख यांच्या विरोधात जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :

Nashik News : देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी संजय गायकवाड, व्हा चेअरमन पदी अर्चना आहेर
Nashik NDCC Bank | २६७ दिवसानंतरही निर्णय झाला नसल्याने जिल्हा बँक वाचविण्यासाठी हालचाली
‘यशस्‍वीला ‘बॅझबॉल’ने नाही तर त्‍याच्‍या संघर्षाने घडवलंय’ : नासिर हुसेन यांनी डेकेटला सुनावले

Latest Marathi News शेतीचे साहित्य चोरट्यांचा सुळसुळाट, पावणे तीन लाखाचा ऐवज लंपास Brought to You By : Bharat Live News Media.