जिथे गाड्यांच्या काचा फोडल्या पोलिसांनी तिथेच काढली धिंड
सातपूर : Bharat Live News Media वृत्तसेवा- श्रमिकनगर सात माउली चौक येथे सात गाड्यांच्या काचा फोडण्याची घटना रविवारी (दि. १८) घडली होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवरदेखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करत तत्काळ सूत्रे हलवत पाच संशयित आरोपी पकडले होते. सोमवारी ज्या परिसरात काचा फोडल्या त्या ठिकाणी सागर हुलनोर, सुधीर भालेराव, ऋषिकेश ऊर्फ संकेत पवार, दीपक अहिरे, मिलिंद मुंढे (सर्व रा. श्रमिकनगर) यांची धरपकड केली असून, त्यांची परिसरात धिंड काढण्यात आली. तर यातील आणखी दोन संशयित फरार आहेत.
सायंकाळी साडेपाच वाजता सात माउली चौक झेडपी कॉलनी शनी चौक या ठिकाणाहून पाच संशयितांची परिसरातून धिंड काढली. सहायक पोलिस निरीक्षक राजू पठाण, उपनिरीक्षक श्याम जाधव, पोलिस कर्मचारी विलास गिते, सागर गुंजाळ यांच्यासह डीबी पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले. टवाळखोरांवर अंकुश लावण्यासाठी गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा
सोळू स्फोट प्रकरण : शुभम ठाकूर, आकाश गावडे यांना पोलिस कोठडी
परेडनंतरही गुंड झाले उदंड! महिलेच्या खुनाचा प्रयत्न
Mega Exclusive Pathaan 2 : शाहरुख इज कम बॅक! दीपिका पादुकोन धुमाकूळ घालायला तयार
Latest Marathi News जिथे गाड्यांच्या काचा फोडल्या पोलिसांनी तिथेच काढली धिंड Brought to You By : Bharat Live News Media.