समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा कायम

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. ईडी आणि सीबीआयने दाखल केलेल्या या गुन्ह्यात १ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या एफआयआरच्या आधारे ईडीने वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला … The post समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा कायम appeared first on पुढारी.

समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा कायम

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. ईडी आणि सीबीआयने दाखल केलेल्या या गुन्ह्यात १ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या एफआयआरच्या आधारे ईडीने वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्ज जप्त केल्याच्या प्रकरणानंतर वानखेडे चर्चेत आले होते. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. वानखेडे यांनी हा खटला रद्द करण्यात यावा आणि कोणत्याही सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वानखेडे यांना आता १ मार्चपर्यंत संरक्षण मिळाले आहे.
हेही वाचा : 

राहुल गांधींना दिलासा, मानहानी प्रकरणी सुलतानपूर कोर्टातून जामीन
धक्कादायक ! पोलिस निरीक्षकाने जीवन संपवले
मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण, ओबीसीत समावेश नाही

Latest Marathi News समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा कायम Brought to You By : Bharat Live News Media.