राहुल गांधींना दिलासा, मानहानी प्रकरणी जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राहुल गांधी यांनी २०१८ मध्‍ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍याबाबत वादग्रस विधान केले होते. या प्रकरणी मानहानीचा खटला सुलतानापूर न्‍यायालयात सुरु आहे. याप्रकरणी आज न्‍यायालयाने राहुल गांधी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. ( UP court gives Rahul Gandhi bail in 2018 defamation case ) मानहानी प्रकरणी … The post राहुल गांधींना दिलासा, मानहानी प्रकरणी जामीन मंजूर appeared first on पुढारी.

राहुल गांधींना दिलासा, मानहानी प्रकरणी जामीन मंजूर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : राहुल गांधी यांनी २०१८ मध्‍ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍याबाबत वादग्रस विधान केले होते. या प्रकरणी मानहानीचा खटला सुलतानापूर न्‍यायालयात सुरु आहे. याप्रकरणी आज न्‍यायालयाने राहुल गांधी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. ( UP court gives Rahul Gandhi bail in 2018 defamation case )
मानहानी प्रकरणी राहुल गांधी आज सुलतानापूर न्यायालयात हजर झाले. यावेळी कडक बंदोबस्त तैनात करण्‍यात आला होता. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला, अशी माहिती वकील संतोष पांडे यांनी दिली. ते म्हणाले की, “राहुल गांधी यांनी आज न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांचा जामीन अर्ज सादर करण्‍यात आला. त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची सुरक्षा आणि 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला.”

STORY | UP court gives Rahul Gandhi bail in 2018 defamation case
READ: https://t.co/vNmsawWIXw
(PTI Photo) pic.twitter.com/a1Zv9FkDLm
— Press Trust of India (@PTI_News) February 20, 2024

 
Latest Marathi News राहुल गांधींना दिलासा, मानहानी प्रकरणी जामीन मंजूर Brought to You By : Bharat Live News Media.