65 वर्षीय वृद्धाचा पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- रावेर तालुक्यातील गोलवाडे येथील पाच वर्षीय मुलीवर तेथीलच एका वृद्ध व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील राहणाऱ्या (हल्ली मुक्काम रावेर तालुक्यातील गोलवाडे) येथे पाच वर्षीय पीडित मुलगी तिच्या आजी सोबत राहत होती. गावातील राहणाऱ्या एका संशयित आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिसात संशयित आरोपी वामन बळीराम बेलदार (65) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कर्मचारी हरिदास बोचरे पुढील तपास करीत आहे.
हेही वाचा :
Maratha Reservation : राज्य सरकारच्या अधिवेशनाविरोधात कुणबी एकीकरण समितीचा मोर्चा
Jalgaon HSC Board Exam 2024 : उद्यापासून बारावीची परीक्षा !
नाशिक : जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न
Latest Marathi News 65 वर्षीय वृद्धाचा पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार Brought to You By : Bharat Live News Media.