सोळू स्फोट प्रकरण : शुभम ठाकूर, आकाश गावडे यांना पोलिस कोठडी

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : सोळू येथील बंद असलेल्या स्पेसिपिक आलोय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटातील अटक दोन आरोपींना पोलिस कोठडी व एका आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यातील आणखी एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली आहे. या भीषण स्फोटात सात जणांचा बळी … The post सोळू स्फोट प्रकरण : शुभम ठाकूर, आकाश गावडे यांना पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

सोळू स्फोट प्रकरण : शुभम ठाकूर, आकाश गावडे यांना पोलिस कोठडी

आळंदी : Bharat Live News Media वृत्तसेवा : सोळू येथील बंद असलेल्या स्पेसिपिक आलोय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटातील अटक दोन आरोपींना पोलिस कोठडी व एका आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यातील आणखी एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली आहे. या भीषण स्फोटात सात जणांचा बळी गेला आहे, तर पंधरा जण जखमी झाले आहेत.
आरोपी नरेंद्र मोहनलाल सुराणा (वय 68 वर्षे, रा. मुकुंदनगर, पुणे) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तर या स्फोटासाठी कारणीभूत ठरलेले आरोपी शुभम रामदास ठाकूर (वय. 26) व आकाश बाबूराव गावडे (वय 21) यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने पोलिस कस्टडी दिली आहे. पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, माजी सभापती रामदास ठाकूर यांचा मुलगा शुभम ठाकूर याला या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याने खेड तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा

जपानी माणसाने कार्टूनशी केले लग्न!
कोरोनाने अनेक भारतीयांना दिले फुप्फुसाचे दुखणे!
पृथ्वीभोवती असू शकतात अज्ञात ‘लघुचंद्र!’

Latest Marathi News सोळू स्फोट प्रकरण : शुभम ठाकूर, आकाश गावडे यांना पोलिस कोठडी Brought to You By : Bharat Live News Media.