‘यशस्‍वीला ‘बॅझबॉल’ने नाही तर त्‍याच्‍या संघर्षाने घडवलंय’

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताचा युवा फलंदाज यशस्‍वी जैस्‍वाल ( Yashasvi Jaiswal )  याच्‍या आक्रमक फलंदाजीच्‍या यशाचे रहस्‍य हे इंग्लंडच्या नव्या आक्रमक आणि गतिमान ‘बॅझबॉल’ शैली ( Bazball approach) हेच आहे, असा दावा इंग्‍लंडचा फलंदाज बेन डकेट याने केला आहे. अप्रत्‍यक्षपणे त्‍याने यशस्‍वीच्‍या बहारदार खेळीमागे इंग्‍लंडचीच प्रेरणा असल्‍याचे म्‍हटले होते. आता त्‍याला इंग्‍लंडचे माजी कर्णधार … The post ‘यशस्‍वीला ‘बॅझबॉल’ने नाही तर त्‍याच्‍या संघर्षाने घडवलंय’ appeared first on पुढारी.
‘यशस्‍वीला ‘बॅझबॉल’ने नाही तर त्‍याच्‍या संघर्षाने घडवलंय’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : भारताचा युवा फलंदाज यशस्‍वी जैस्‍वाल ( Yashasvi Jaiswal )  याच्‍या आक्रमक फलंदाजीच्‍या यशाचे रहस्‍य हे इंग्लंडच्या नव्या आक्रमक आणि गतिमान ‘बॅझबॉल’ शैली ( Bazball approach) हेच आहे, असा दावा इंग्‍लंडचा फलंदाज बेन डकेट याने केला आहे. अप्रत्‍यक्षपणे त्‍याने यशस्‍वीच्‍या बहारदार खेळीमागे इंग्‍लंडचीच प्रेरणा असल्‍याचे म्‍हटले होते. आता त्‍याला इंग्‍लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी सडेतोड प्रत्‍युत्तर दिले आहे. “यशस्वी जैस्वाल याला तुम्‍ही क्रिकेट शिकवले नाही, त्‍याच्‍या यशाचे रहस्‍य ‘बॅझबॉल’ नाही तर  याला जगण्‍यातील संघर्षाने घडवलंय आहे.”, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. ( Yashasvi Jaiswal hasn’t learned from you : Nasser Hussain to Ben Duckett )
इंग्‍लंड विरुद्धच्‍या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वाल याने दोनवेळा व्‍दिशतकी खेळी साकारली आहे. धडाकेबाज फलंदाजीमुळे यशस्‍वी जैस्‍वाल हा मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 6 डावांत 109 च्या सरासरीने आणि 81.1 च्या स्ट्राइक रेटने 545 धावा केल्या आहेत. त्‍याच्‍या फलंदाजीचे आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर कौतुक होत आहे. ( Yashasvi Jaiswal hasn’t learned from you : Nasser Hussain to Ben Duckett )
यशस्‍वीच्‍या यशाचे डकेटने इंग्‍लंडच्‍या ‘बॅझबॉल’ शैलीला दिले श्रेय
भारताचा युवा फलंदाज यशस्‍वी जैस्‍वाल याच्‍या आक्रमक फलंदाजीचे रहस्‍य हे इंग्लंडच्या या नव्या, आक्रमक, गतिमान शैलीला ‘बॅझबॉल’मुळे आहे, असा दावा इंग्‍लंडचा फलंदाज बेन डकेट याने केला. सध्‍या इंग्‍लंडचे प्रशिक्षक इंग्‍लंडचे प्रशिक्षक ब्रेंडम मॅकलम आहेत. त्‍याच्‍या आक्रमक फलंदाजीच्‍या शैलीला बॅझ असे म्‍हटलं जाते. खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजी करताना पूर्ण स्‍वातंत्र्य  म्‍हणजे बॅझबॉल क्रिकेट. आता यशस्‍वी हा इंग्‍लंडच्‍या खेळाडूंप्रमणोच बॅझबॉल शैलीत खेळतो म्‍हणून तो धावा करत असल्‍याचे डकेट याला सांगायचे होते.
संघर्षाने त्‍याला घडवलंय…
बेन डकेट याने यशस्‍वीबाबत केलेला दावा इंग्‍लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी फेटाळला आहे. ‘स्काय स्पोर्ट्स’ पॉडकास्टवर मायकेल आथर्ट याच्‍याशी बोलताना हुसेन म्‍हणाले की, “तो तुमच्याकडून क्रिकेट खेळायला शिकलेला नाही. तो त्याच्या संगोपनातून शिकला आहे. संघर्षमय परिस्‍थितीला तोंड देत त्‍याने प्रचंड मेहनत घेतली आहे. तो आयपीएलमधून शिकला आहे.”
आत्‍मपरीक्षण करा, यशस्‍वीकडून शिका…
इंग्‍लंडचे खेळाडू यशस्‍वी बद्दल ड्रेसिंग रूममध्ये जे काही बोलत आहेत मला आशा आहे की, ते आत्मपरीक्षण करतील. त्यांच्या (यशस्‍वीच्या)  खोलीत परत जातील. त्याच्याकडून शिकू शकतील, असा टोलाही नासेर यांनी इंग्‍लंडच्‍या खेळाडूंना लगावला.
‘बॅझबॉल’वर टीका सहन करण्‍याचीही तयारी ठेवा
तुम्‍ही तुमचेच बरोबर असे म्‍हणत असाल तर तो एक पंथ बनतो. ‘बॅझबॉल’ वर्णन हे एक पंथ म्हणून केले गेले आहे. आता पंथ म्‍हटलं की तुम्‍ही टीका करु शकत नाही. मात्र इंग्लंडने बॅझबॉलवरही टीका सहन करण्‍याची तयारी ठेवा. कारण तुम्‍ही पारदर्शी असणे आवश्यक असते. ज्या संस्कृतीत फीडबॅकसाठी जागा नाही ती संस्कृती इंग्लिश क्रिकेटसाठी घातक ठरू शकते, असा सल्‍लाही नासिर हुसेन यांनी इंग्‍लंडच्‍या खेळीडूंना दिला आहे.

‘The comment about Jaiswal having learnt from us… if anything England should be learning from him’ 🇮🇳🗯️
Head to YouTube for the full Sky Sports Cricket podcast!pic.twitter.com/6Wz3FuypEl
— Sky Sports (@SkySports) February 19, 2024

हेही वाचा : 

IND vs ENG : पराभव लागला जिव्‍हारी! इंग्‍लंडच्‍या कर्णधार म्‍हणतो, “ते तीन निर्णय…”
IND vs ENG 4th Test : रांची कसोटीतून बुमराह बाहेर? बंगालच्या 2 पैकी एका गोलंदाजाला मिळणार संधी?

 
 
Latest Marathi News ‘यशस्‍वीला ‘बॅझबॉल’ने नाही तर त्‍याच्‍या संघर्षाने घडवलंय’ Brought to You By : Bharat Live News Media.