उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना टिकणार : खासदार संजय राऊत

बाणेर : ‘वस्ताद श्री-2024 शरीरसौष्ठव’ स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना व्यासपीठ मिळाले आहे. यामुळे त्यांना आपले कसब सादर करता आल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. राजकीय विषयावर भाष्य करताना ते म्हणाले, ’आगामी निवडणुकांत केवळ उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेच टिकणार आहे. या निवडणुकीत भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही.’ हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त म्हाळुंगे येथे ‘वस्ताद … The post उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना टिकणार : खासदार संजय राऊत appeared first on पुढारी.

उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना टिकणार : खासदार संजय राऊत

बाणेर : ‘वस्ताद श्री-2024 शरीरसौष्ठव’ स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना व्यासपीठ मिळाले आहे. यामुळे त्यांना आपले कसब सादर करता आल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. राजकीय विषयावर भाष्य करताना ते म्हणाले, ’आगामी निवडणुकांत केवळ उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेच टिकणार आहे. या निवडणुकीत भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही.’
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त म्हाळुंगे येथे ‘वस्ताद श्री 2024’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी राऊत बोलत होते. म्हाळुंगे गावचे माजी सरपंच मयूर भांडे, बाळासाहेब भांडे व एमबी फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. बक्षीस वितरण आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर, संजय मोरे, गजानन थरकुडे, चंद्रकांत मोकाटे, सचिन खैरे, स्वाती ढमाले आदी उपस्थित होते.
हेही वाचा

सूर्यावर पाच वर्षांतील चौथा मोठा स्फोट
परेडनंतरही गुंड झाले उदंड! महिलेच्या खुनाचा प्रयत्न
पृथ्वीभोवती असू शकतात अज्ञात ‘लघुचंद्र!’

Latest Marathi News उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना टिकणार : खासदार संजय राऊत Brought to You By : Bharat Live News Media.