जगातील सर्वात जुना रंग
कॅनबेरा : रंग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आपल्याला आजूबाजूला अनेक रंग पाहायला मिळतात. आपल्या भावना, तसेच आपल्या दैनंदिन जीवनात रंगांचा मोठा सहभाग असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात जुना रंग कोणता? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटतं की, काळा आणि पांढरा हे दोन जगातील सर्वात जुने रंग आहेत. जगातील सर्वात जुना, सर्वात पहिला रंग कोणता? या प्रश्नाचं उत्तर आज जाणून घेऊयात… यासोबतच या रंगामागील खरं शास्त्र काय आहे, हेदेखील जाणून घेऊयात…
अलीकडील संशोधनात असं म्हटलं आहे की, सर्वात जुना रंग चक्क गुलाबी आहे. संशोधकांना असं आढळलं की, गुलाबी रंग सुमारे 1.1 अब्ज वर्ष जुना आहे. संशोधकांनी जमिनीतून लाखो वर्ष जुना खडक काढला असून, त्याच्या आत गुलाबी रंग सापडला आहे. हा रंग बबल गमसारखा आहे. ऑस्ट्रेलियन संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, या संशोधनावरून हे सिद्ध होतं की, पृथ्वी अस्तित्वात आल्यापासूनच गुलाबी रंग अस्तित्वात आहे. पूर्वीच्या काळात, गुलाबी रंग हा द्रव्याच्या स्वरूपात असायचा, जो सूक्ष्म जीवांद्वारे बनवला जायचा.
शस्त्रज्ञांच्या प्रचंड संशोधनानंतर हे सिद्ध झालं की, जगातील सर्वात जुना रंग काळा किंवा पांढरा नसून तो गुलाबी आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या रिसर्च स्कूल ऑफ अर्थ सायन्सेसचे प्रमुख अभ्यासक नूर गुएनेली यांनी एका निवेदनात म्हटलं की, सूर्यप्रकाशावर जगणारे प्राचीन प्राणी हे हरवलेल्या महासागरालादेखील गुलाबी रंग देतात. सर्वात जुने मृत सेंद्रिय पदार्थ, उदाहरणार्थ सायनोबॅक्टेरियाचं फूल, जे समुद्राच्या तळाशी त्वरित बुडतं आणि अब्जावधी वर्षांनी एक रंग घेतं. त्या फुलानेदेखील चमकदार गुलाबी रंग धारण केला आहे. बर्याच अभ्यासानंतर पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनीदेखील सर्वात जुना रंग हा केवळ गुलाबी असल्याचं म्हटलं होतं.
Latest Marathi News जगातील सर्वात जुना रंग Brought to You By : Bharat Live News Media.