Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘प्रतिशोध’ झुंज अस्तित्वाची ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. ‘प्रतिशोध’ ही मालिका आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे. तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं आणि त्यांचा संघर्ष यांची कहाणी या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ममता एमडी झालेली आहे आणि दिशा तिची मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी तिला संघर्ष करावे लागते आहे. सत्यजिषराहण्यासाठी तिला हे साध्य करणे फार महत्त्वाचे आहे.
संबंधित बातम्या –
Mega Exclusive Pathaan 2 : शाहरुख इज कम बॅक! दीपिका पादुकोन धुमाकूळ घालायला तयार
Don 3 Big Announce : रणवीरसोबत कियाराची जोडी! निर्मात्यांची घोषणा
Prarthana Behere : छ. शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर प्रार्थनाची माफी
पण मालिकेत आता एन्ट्री होणार आहे रमेश वाणी यांची. गुरू माँ असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. ते चक्क तृतीयपंथी व्यक्तिरेखा साकारताना प्रेक्षकांना दिसतील. विविध चित्रपट, मालिका यांत गाजलेल्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. ‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची! या मालिकेतील त्यांच्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेमुळे मालिका काय वळण घेईल, हे आता पाहायला मिळेल. रमेश वाणी यांची गुरू मा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेईल. गुरू मा या व्यक्तिरेखेची चर्चा सर्वत्र रंगणार आहे.
Ramesh Vani
तृतीयपंथी व्यक्तिरेखा असल्यामुळे त्यांचे हावभाव पाहण्यासारखे असतील. गुरू मा ही तृतीयपंथीयांची प्रमुख आहे आणि ममता हिच दिशाची आई आहे, हे सत्य तिला माहित आहे. पण ती सत्य सांगून ममताला मदत करेल का की सत्यजीतची बाजू घेऊन ममताच्या अडचणींमध्ये भर घालेल, हे आता मालिकेत पाहायला मिळेल.
‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची. सोम. ते शुक्र. रा. १० वा. पाहता येईल.
Latest Marathi News ‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची! रमेश वाणी तृतीयपंथी भूमिकेत Brought to You By : Bharat Live News Media.