शिवसृष्टीसाठी सर्वतोपरी मदत : डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे : नर्‍हे-आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचे काम वेगाने पूर्ण होण्याच्या दृष्टीने दिल्लीमधून आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे आश्वासन पुण्याच्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिले. कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने साकारत असलेल्या शिवसृष्टीला डॉ. कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भेट दिली. डॉ. कुलकर्णी यांनी … The post शिवसृष्टीसाठी सर्वतोपरी मदत : डॉ. मेधा कुलकर्णी appeared first on पुढारी.

शिवसृष्टीसाठी सर्वतोपरी मदत : डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे : नर्‍हे-आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचे काम वेगाने पूर्ण होण्याच्या दृष्टीने दिल्लीमधून आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे आश्वासन पुण्याच्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिले. कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने साकारत असलेल्या शिवसृष्टीला डॉ. कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भेट दिली.
डॉ. कुलकर्णी यांनी या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करीत त्यांना अभिवादन केले. शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आबा रावत, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मुतालिक आदी उपस्थित होते.
हेही वाचा

राजमाता जिजाऊंनीच शिवरायांना घडविले : शरद पवार
बावधनमध्ये चक्क प्रशासनाकडूनच पदपथ गिळंकृत!
प्रशासकराजमुळे डीपी लटकवला!

Latest Marathi News शिवसृष्टीसाठी सर्वतोपरी मदत : डॉ. मेधा कुलकर्णी Brought to You By : Bharat Live News Media.