घोडेस्वारीत भारताच्या अनुष अग्रवालाने रचला इतिहास; मिळवले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

पुढारी ऑनलाईन डेस्क : हांगझू येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये घोडेस्वारीमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणारा घोडेस्वार अनुष अग्रवाला याने देशाला घोडेस्वारीमध्ये पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय इक्वेस्ट्रियन फेडरेशनच्या स्पर्धांमधील अनुषच्या कामगिरीमुळे त्याला ऑलिम्पिकचा तिकीट मिळाला आहे. (Anush Agarwalla) ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे अनुषचे स्वप्न अनुषने वॉरक्लॉ (पोलंड) येथे 73.485 टक्के, नेदरलँड्समधील क्रोननबर्ग येथे 74.4 टक्के, फ्रँकफर्ट, जर्मनीमध्ये … The post घोडेस्वारीत भारताच्या अनुष अग्रवालाने रचला इतिहास; मिळवले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट appeared first on पुढारी.

घोडेस्वारीत भारताच्या अनुष अग्रवालाने रचला इतिहास; मिळवले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हांगझू येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये घोडेस्वारीमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणारा घोडेस्वार अनुष अग्रवाला याने देशाला घोडेस्वारीमध्ये पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय इक्वेस्ट्रियन फेडरेशनच्या स्पर्धांमधील अनुषच्या कामगिरीमुळे त्याला ऑलिम्पिकचा तिकीट मिळाला आहे. (Anush Agarwalla)
ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे अनुषचे स्वप्न
अनुषने वॉरक्लॉ (पोलंड) येथे 73.485 टक्के, नेदरलँड्समधील क्रोननबर्ग येथे 74.4 टक्के, फ्रँकफर्ट, जर्मनीमध्ये 72.9 टक्के, बेल्जियममधील मिशेलिन येथे 74.2 टक्के गुण मिळवले. इंडियन इक्वेस्टियन असोसिएशन दिलेल्या माहितीनुसार ऑलिम्पिकचे हे तिकीट भारतासाठी आहे.
या स्पर्धेकांना सहभागी होण्यासाठी रायडर्संच्या चाचण्या घेतल्या जातील. यावेळी बोलताना अनुष म्हणाला, ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे त्याचे बालपणीचे स्वप्न आहे आणि देशासाठी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होताना मला अभिमान वाटेल. अनुष पुढे म्हणाला, ‘पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी कोटा मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान आहे. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणे हे नेहमीच माझे बालपणीचे स्वप्न राहिले आहे आणि देशासाठी या ऐतिहासिक क्षणाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. मी नेहमी जे केले तेच करत राहीन.
नेहमी ध्येयावर लक्ष केंद्रित करा, शिस्तबद्ध व्हा, कठोर परिश्रम करा, ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करा. मला खात्री आहे की या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी माझी निवड होईल.
जयवीर सिंग यांनीही केले अभिनंदन
कोटा कायम ठेवण्यात तो यशस्वी होईल, अशी आशा त्याला होती. इंडियन इक्वेस्टियन फेडरेशनचे (EFI) सरचिटणीस कर्नल जयवीर सिंग यांनीही अनुषचे अभिनंदन केले आहे. जयवीर म्हणाले, ‘ड्रेसेज इव्हेंटमध्ये वैयक्तिक कोटा वाटप करण्याबाबत आम्हाला EFI कडून पुष्टी मिळाली आहे.
ईएफआय स्पर्धांमध्ये अनुषच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताला कोटा मिळाला आहे, ही अभिमानाची बाब आहे. EFI स्पर्धांमध्ये आणि अश्वारूढ स्पर्धांमध्ये भारताला पुन्हा एकदा ऑलिम्पिक प्रतिनिधित्व मिळेल यात अजिबात आश्चर्य नाही.
‘या’ खेळांडूंनी केले प्रतिनिधित्व
फवाद मिर्झा यांने 2020 साली झालेल्या टोकियो गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या आधी फक्त इम्तियाज अनीस (2000), इंद्रजीत लांबा (1996) आणि दरिया सिंग (1980) यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

Anush Agarwalla gets first ever Paris Olympics quota in Dressage for India
Read @ANI Story | https://t.co/iOkPl1YkSZ#AnushAgarwalla #ParisOlympics2024 #Equestrian pic.twitter.com/bWluzFRucQ
— ANI Digital (@ani_digital) February 19, 2024

हेही वाचा :

Stock Market Updates | शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ‘हे’ शेअर्स अ‍ॅक्शनमध्ये?
डीआरडीओ, एचएएल, ऑर्डिनन्स फॅक्टरी सक्षम करणार : अजय भट
Share Market | गुंतवणूकदारांना निवडणुकीपूर्वी बाजारातील तेजीचा फायदा घेण्याची संधी, जाणून घ्या अधिक

Latest Marathi News घोडेस्वारीत भारताच्या अनुष अग्रवालाने रचला इतिहास; मिळवले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट Brought to You By : Bharat Live News Media.