Bharat Live News Media ऑनलाईन : शेअर बाजारातील सलग पाचव्या सत्रांतील तेजीला आज मंगळवारी ब्रेक लागला. सुरुवातीला सेन्सेक्स १३० हून अधिक अंकांनी घसरून ७२,६०० च्या खाली आला. तर निफ्टी २२,१०० च्या खाली आला होता. त्यानंतर काहीवेळातच दोन्ही निर्देशांक सपाट झाले. बँकिंगसह आयटी क्षेत्रात विक्री दिसून येत आहेत. (Stock Market Updates)
आशियाई बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांचा मागोवा घेत मंगळवारी भारतीय इक्विटी निर्देशांक खाली आले. इंडेक्स हेवीवेट, रिलायन्स इंडस्ट्रीज, ICICI बँक आणि इन्फोसिस यात घसरण दिसून येत आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सवर एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, मारुती, एसबीआय हे शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते. तर पॉवर ग्रिड, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक हे शेअर्स वाढले आहेत.
निफ्टीवर आयशर मोटर्स, हिरो मोटर्स, बजाज ऑटो, कोल इंडिया, एम अँड एम हे टॉप लूजर्स आहेत. तर पॉवर ग्रिड, कोटक बँक, यूपीएल, ग्रासीम, अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स तेजीत आहेत. (Stock Market Updates)
हे ही वाचा :
गुंतवणूकदारांना निवडणुकीपूर्वी बाजारातील तेजीचा फायदा घेण्याची संधी
सलग पाचव्या सत्रांत तेजी, दिवसभरात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा
निफ्टी पुनश्च 22000 च्या पार
Latest Marathi News शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ‘हे’ शेअर्स अॅक्शनमध्ये? Brought to You By : Bharat Live News Media.