कोल्हापूर : ‘भोगावती’ अर्थिक अडचणीतून सावरण्याचे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

राशिवडे; प्रवीण ढोणे : तुम्ही भोगावतीच्या हितासाठी ३५ वर्षाचे राजकीय वैरत्व बाजुला ठेवले, ए.वाय.तुम्हीही राजकीय जुळण्या लावत भक्कम आघाडी केली, सभासदांनीही तुमच्यावर मोठा विश्वास टाकत सतेची सुत्रे पुन्हा तुमच्याकडे दिली. आता पी.एन पाटील, ए.वाय पाटील आणि क्रांती पवार तुमची जबाबदारी वाढली आहे. भोगावतीला अर्थिक अडचणीतून बाहेर काढून कारखाना सावरण्याचे आव्हान तुम्हालाच पेलावे लागणार आहे, अशा … The post कोल्हापूर : ‘भोगावती’ अर्थिक अडचणीतून सावरण्याचे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान appeared first on पुढारी.
कोल्हापूर : ‘भोगावती’ अर्थिक अडचणीतून सावरण्याचे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान


राशिवडे; प्रवीण ढोणे : तुम्ही भोगावतीच्या हितासाठी ३५ वर्षाचे राजकीय वैरत्व बाजुला ठेवले, ए.वाय.तुम्हीही राजकीय जुळण्या लावत भक्कम आघाडी केली, सभासदांनीही तुमच्यावर मोठा विश्वास टाकत सतेची सुत्रे पुन्हा तुमच्याकडे दिली. आता पी.एन पाटील, ए.वाय पाटील आणि क्रांती पवार तुमची जबाबदारी वाढली आहे. भोगावतीला अर्थिक अडचणीतून बाहेर काढून कारखाना सावरण्याचे आव्हान तुम्हालाच पेलावे लागणार आहे, अशा प्रतिक्रिया निकालानंतर सभासदांमधून व्यक्त होत आहेत.
संबधित बातम्या : 

‘भोगावती’त सत्ताधारीच, २४ जागांवर एकतर्फी विजय
पी. एन. पाटीलच किंगमेकर, ‘भोगावती’च्या निवडणुकीत नेमकं काय घडलं?
बिद्रीसाठी चिन्हे वाटप; प्रचाराची चक्रे गतिमान

३५ वर्षाचे राजकीय वैरत्व बाजूला ठेवून भोगावतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील आणि शेकापचे माजी आमदार संपतराव पवार एकत्र आले. यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे ए.वाय.पाटील यांनी आघाडी भक्कम केली. खरंच भोगावती अर्थिक अडचणीत आहे, हे सभासद, कर्मचारीसुध्दा जाणून आहेत. जिल्ह्याचे राजकारण करत असताना अर्थिक नाडी असणारी जिल्हा बँकही नामदार मुश्रीफ, आमदार पी.एन, ए.वाय.पाटील यांच्या  ताब्यात आहे. हीच बँक भोगावतीला अर्थपुरवठा करते. सध्या असणाऱ्या कारखान्यावर कर्जासाठी बँकेशी तडजोड करून दीर्घकाळाचे कर्जाचे हप्ते घ्यावे लागणार आहेत. तसेच कारखान्याचा आत्मा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊनच कारभार करावा लागणार आहे. तसेच ऊस उत्पादक सभासदांनाही ऊसबिले वेळेत द्यावी लागणार आहेत.
भोगावती’समोर अनेक अडचणींचा पर्वतच उभा आहे, तुमच्याकडून अपेक्षा आहेत, म्हणून सभासदांनी तुमच्यावर विश्वास ठेवून पुन्हा भोगावतीच्या सतेची चावी तुमच्याकडे सोपविली आहे. शेकापचे संपतराव पवार हे आरोग्याच्या कारणास्तव फिरू शकत नाहीत, म्हणून त्यांनी कारभाराकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यांचे पुत्र क्रांतीसिह पवार-पाटील तुमचीही जबाबदारी वाढली आहे. सभासदांना दिलेले वचन आणि शब्दाला तुम्ही जागलात तर भविष्यातील राजकारणात तुम्हाला कोणतीच अडचण भासणार नाही, अशा शेतकऱ्यांच्या भावना आहेत. आमदार पी.एन पाटील, ए.वाय पाटील आणि क्रांतीसिह पवार-पाटील  सभासदांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुम्ही दिलेल्या उमेदवारांना निवडून दिले आहे. सभासदांनी आपले काम प्रामाणिकपणे पार पाडले, आता पुढची जबाबदारी तुमचीच असल्याच्या प्रतिक्रिया सभासद देत आहेत.
हेही वाचा : 

कोल्हापूर सेफ सिटी कधी?
कोल्हापूर : ऊस दरावरून शेट्टी-खोत यांच्यात जुंपली
आता लढाई आरपारची; गुरुवारी महामार्ग रोखणार : राजू शेट्टी

 
The post कोल्हापूर : ‘भोगावती’ अर्थिक अडचणीतून सावरण्याचे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान appeared first on पुढारी.

राशिवडे; प्रवीण ढोणे : तुम्ही भोगावतीच्या हितासाठी ३५ वर्षाचे राजकीय वैरत्व बाजुला ठेवले, ए.वाय.तुम्हीही राजकीय जुळण्या लावत भक्कम आघाडी केली, सभासदांनीही तुमच्यावर मोठा विश्वास टाकत सतेची सुत्रे पुन्हा तुमच्याकडे दिली. आता पी.एन पाटील, ए.वाय पाटील आणि क्रांती पवार तुमची जबाबदारी वाढली आहे. भोगावतीला अर्थिक अडचणीतून बाहेर काढून कारखाना सावरण्याचे आव्हान तुम्हालाच पेलावे लागणार आहे, अशा …

The post कोल्हापूर : ‘भोगावती’ अर्थिक अडचणीतून सावरण्याचे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान appeared first on पुढारी.

Go to Source