लाकडासारखा दिसणारा किडा

लाकडासारखा दिसणारा किडा

मॉस्को : युरोप आणि आशियापासून पूर्व सायबेरियापर्यंत आढळणारा बफ टिप हा किडा आपल्या रंगामुळे आणि रचनेमुळे खूपच वेगळा ठरत आला आहे. अगदी हुबेहूब लाकडाप्रमाणे दिसणारा आणि लाकडाजवळ असेल तर किंचितही ओळखता येणार नाही, असा हा किडा सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. लाकडाप्रमाणेच त्याची ठेवण आहे. हा किडा झाडांवर आराम करतो, त्यावेळी तो ओळखणे खूपच कठीण असते. वाळलेली पाने, झाडेझुडपे यात तर याला शोधणे सहजशक्य कधीच असत नाही.
सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर या किटकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हा किडा सिल्वर बर्चच्या एखाद्या ओंडक्याप्रमाणे अगदी हुबेहूब दिसून येतो. ज्यावेळी धोका असतो, त्यावेळी आपल्या रंगामुळे आणि शरीराच्या रचनेमुळे तो स्वत:चा बचाव करणे सहज साध्य करु शकतो. हा किडा मुख्यत्वेकरून गडद रूपेरी असतो आणि त्याचे पंख साधारणपणे 50 मिमी इतके असतात.
हा कीटक प्रामुख्याने बागांमध्ये दिसून येतो. धोक्याची पूर्वसूचना मिळताच तो वाळलेली पाने-फुले वा लाकडात लपून बसतो. बफ टिप किटकाची ही अनोखी रचनाच त्याला अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनवते. हा किटक रात्रीच्या वेळी दिव्यांच्या दिशेने आकर्षित होतो. अर्थात, याचा वेग मात्र फारच कमी असतो. फलेरा बुसेफला असे याचे शास्त्रीय नाव आहे.
The post लाकडासारखा दिसणारा किडा appeared first on पुढारी.

मॉस्को : युरोप आणि आशियापासून पूर्व सायबेरियापर्यंत आढळणारा बफ टिप हा किडा आपल्या रंगामुळे आणि रचनेमुळे खूपच वेगळा ठरत आला आहे. अगदी हुबेहूब लाकडाप्रमाणे दिसणारा आणि लाकडाजवळ असेल तर किंचितही ओळखता येणार नाही, असा हा किडा सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. लाकडाप्रमाणेच त्याची ठेवण आहे. हा किडा झाडांवर आराम करतो, त्यावेळी तो ओळखणे …

The post लाकडासारखा दिसणारा किडा appeared first on पुढारी.

Go to Source