नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंच्या कारला दिल्लीत अपघात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या वाहनाचा आज दिल्लीत भीषण अपघात झाला. ल्युटन्स दिल्लीतील विश्वंभर दास मार्गावर मागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात खासदार गोडसे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. नाशिकमधील कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसोबत खासदार हेमंत गोडसे आज दिल्लीत शिवजयंती सोहळ्यासाठी आले … The post नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंच्या कारला दिल्लीत अपघात appeared first on पुढारी.

नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंच्या कारला दिल्लीत अपघात

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या वाहनाचा आज दिल्लीत भीषण अपघात झाला. ल्युटन्स दिल्लीतील विश्वंभर दास मार्गावर मागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात खासदार गोडसे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले.
नाशिकमधील कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांसोबत खासदार हेमंत गोडसे आज दिल्लीत शिवजयंती सोहळ्यासाठी आले होते. सकाळी विश्वंभर दास मार्गावरून ते त्यांच्या इनोव्हा गाडीने (क्रमांक एमएच १५ एफसी ९९०९) जात असताना मागून येणाऱ्या चारचाकीने (डीएल ७ सी डब्ल्यू २२०२)  जोरदार धडक दिली. या धडकेतून खासदार गोडसे सावरत असताना पुन्हा एकदा याच वाहनाने त्यांच्या गाडीला आणखी धकड दिली. या विचित्र अपघातात खासदार गोडसे यांना मोठी दुखापत झाली नाही. त्यांच्यासोबत वाहनात असलेले सहकारी देखील सुरक्षित राहिले. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनाक्रमानंतर खासदार गोडसे शिवजयंती कार्यक्रमात सहभागी होऊन पुन्हा नाशिककडे रवाना झाले. आपण व अन्य सहकारी सुखरूप असल्याची प्रतिक्रिया त्यांनी Bharat Live News Mediaशी बोलताना दिली.
Latest Marathi News नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंच्या कारला दिल्लीत अपघात Brought to You By : Bharat Live News Media.