PM मोदींच्या भेटीसाठी अब्दुल्ला पिता-पुत्रांची धडपड :; गुलाब नबी आझाद
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि फारूख अब्दुल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत, अशी माहिती दिल्लीतील सूत्रांच्या माध्यमातून मिळत असल्याचा आरोप जम्मू काश्मीरमधील ज्येष्ठ राजकारणी गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.. (Ghulam Na bi Azad Claim Abdullah)
गुलाम नबी आझाद यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, “मी कधीही असा दावा केला नाही की, ते (फारूख अब्दुल्ला) त्यांना (पीएम मोदी) भेटले आहेत. मी म्हणालो की, “दिल्लीतील सूत्रांद्वारे असे समजले आहे की, ते रात्रीच्या वेळीच केंद्रीय नेतृत्वाला भेटण्याचा प्रयत्न करतात”. (Ghulam Nabi Azad Claim Abdullah)
जम्मू काश्मीरमधील डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी ‘इंडिया टुडे टीव्ही’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, अब्दुल्ला पितापुत्र आणि कुटुंबिय “श्रीनगरमध्ये एक बोलतात, जम्मूमध्ये दुसरे आणि दिल्लीत तिसरे काहीतरी,” त्यांच्या भूमिकेत दुटप्पीपणाचा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. (Ghulam Nabi Azad Claim Abdullah)
#WATCH | Democratic Progressive Azad Party (DPAP) President Ghulam Nabi Azad clarifies on the reports in the media.
He says, “I never claimed that he (Farooq Abdullah) met him (PM Modi). I said that through sources in Delhi, it has come to be known that he tries to meet central… pic.twitter.com/jFx8f4c5EF
— ANI (@ANI) February 19, 2024
२०१४ मध्ये भाजपसोबत युती करण्यासाठी अब्दुल्ला पिता-पुत्रांचे प्रयत्न
जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी २०१४ मध्ये भाजपसोबत युती करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी भविष्यात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होण्याचे संकेत दिले होते, जे नंतर ओमर अब्दुल्ला यांनी नाकारले, असा दावा देखील आझाद यांनी केला. अशाप्रकारे अब्दुल्ला पिता-पुत्र जोडीने दुहेरी खेळ खेळत असल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. (Ghulam Nabi Azad Claim Abdullah)
जम्म काश्मीरमधील ‘हे’ भाजपसोबतच
फारुख आणि उमर अब्दुल्ला हे सरकार आणि विरोधी पक्षांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) या दोघांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले होते, असा आरोप देखील जम्मू काश्मीरचे माजी काँग्रेस सदस्य आझाद यांनी केला आहे.
कलम ३७० रद्द करण्याबाबत अब्दुल्लांना माहिती होते
कलम ३७० रद्द करण्यापूर्वी ३ ऑगस्ट २०१९ रोजी अब्दुल्ला आणि पंतप्रधान मोदी यांच्यात भेट झाली होती. दरम्यान दिल्लीत अफवा पसरल्या की अब्दुल्ला यांना या निर्णयाबाबत विश्वासात घेण्यात आले होते. तेव्हा त्यांनी घाटीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला केल्या होत्या, असा दावा देखील गुलाब नबी आझाद यांनी केला आहे.
गुलाब नबी आझाद यांचा अब्दुल्ला कुटुंबियांवर हल्लाबोल
स्वत:ला सर्वात धर्मनिरपेक्ष नेते म्हणून स्थान देत गुलाब नबी आझाद म्हणाले, “मी अब्दुल्लांप्रमाणे फसवणूक करत नाही. मी माझ्या हिंदू बांधवांना मूर्ख बनवण्यासाठी मंदिरांना भेट देत नाही आणि कट्टर इस्लामवाद्यांना खूश करण्यासाठी मी माझ्या राष्ट्राचा गैरवापर करत नाही.”असा हल्लाबोल आझाद यांनी अब्दुल्ला कुटुंबियांवर केला आहे.
हेही वाचा:
Farooq Abdullah : INDIA आघाडीला आणखी एक धक्का; फारूक अब्दुल्लांचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय
Farooq Abdullaha On Ram : ‘मेरे राम, मेरे राम… ‘ ; फारूक अब्दुल्लाही झाले राम भजनात दंग
काँग्रेसला मोठा धक्का! गुलाब नबी आझाद यांचा पक्षातील सर्व पदांसह सदस्यत्वाचाही राजीनामा
The post PM मोदींच्या भेटीसाठी अब्दुल्ला पिता-पुत्रांची धडपड :; गुलाब नबी आझाद appeared first on Bharat Live News Media.