नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात

पुढारी ऑनलाइन ; नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सुदैवाने या अपघातातून हेमंत गोडसे हे बचावले आहेत. दिल्लीतील बीडी रोडवर असलेल्या शासकीय निवासस्थानाजवळच कारला अपघात झाल्याची माहिती आहे. खासदार गोडसे हे दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानाहुन बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीची मागून धडक बसली. यात तिघांना मार … The post नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात appeared first on पुढारी.

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात

Bharat Live News Media ऑनलाइन ; नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सुदैवाने या अपघातातून हेमंत गोडसे हे बचावले आहेत. दिल्लीतील बीडी रोडवर असलेल्या शासकीय निवासस्थानाजवळच कारला अपघात झाल्याची माहिती आहे.
खासदार गोडसे हे दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानाहुन बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीची मागून धडक बसली. यात तिघांना मार लागल्याची माहिती आहे. या अपघातात गोडसे यांच्या कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
खासदार गोडसे हे दिल्लीतील बी डी मार्गावरुन आपल्या इनोव्हा (MH 15 FC 9909) या क्रमाकाच्या कारने जात होते. यावेळी आर्टिका डीएल DL 7CW 2202 या गाडीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने खासदार गोडसे यांना दुखापत झाली नाही, तर सहकारी किरकोळ जखमी असल्याचे कळते आहे.
Latest Marathi News नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात Brought to You By : Bharat Live News Media.