सनी लिओनीच्या बनावट ओळखपत्राने गोंधळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनी ( Sunny Leone ) कायमच चर्चेत असते. आती ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पोलिस भरतीत सनीचे नाव आले आहे. पोलिस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहे. एक प्रवेश पत्र कन्नौज जिल्ह्याच्या केंद्रातून व्हायरल झाल आहे, त्यावर सनीचा फोटो आणि नाव आहे. … The post सनी लिओनीच्या बनावट ओळखपत्राने गोंधळ appeared first on पुढारी.

सनी लिओनीच्या बनावट ओळखपत्राने गोंधळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनी ( Sunny Leone ) कायमच चर्चेत असते. आती ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पोलिस भरतीत सनीचे नाव आले आहे. पोलिस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहे. एक प्रवेश पत्र कन्नौज जिल्ह्याच्या केंद्रातून व्हायरल झाल आहे, त्यावर सनीचा फोटो आणि नाव आहे. यानंतर खूपच गोंधळ झाल्याचे दिसून येत आहे.
संबंधित बातम्या 

Sunny Leone : सनी लिओनीचा ‘फना’ व्हिडिओ साँग प्रेक्षकांच्या भेटीला
Sunny Leone New Song : सनी लिओनीचा “तेरी लाल चुनरिया”मध्ये जलवा (Video)
Sunny Leone : सनीने दिली वाराणसीला भेट, केली गंगा आरती (Video)

व्हायरल झालेल्या कार्डवर सनीचे ( Sunny Leone ) दोन फोटो दिसत आहेत. ही माहिती अधिकार्‍यांपर्यंत पोहोचल्यावर सर्वजण गोंधळून गेले. कार्डनुसार, उमेदवाराला तिर्वा येथील श्रीमती सोनश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेजमध्ये परीक्षेला बसायचे होते. ही उमेदवार होती सनी! हे पाहून सर्वांनाच धक्का बसला; मात्र हे प्रवेशपत्र खरे नसून कुणीतरी एडिट करून व्हायरल केल्याचेही बोलले जात आहे.

काही उमेदवारांनी फॉर्म भरताना चुकीचा फोटो अपलोड केल्याचेही सांगण्यात येत आहे. भरती मंडळाला ही माहिती मिळाल्यावर त्यांनी संबंधित उमेदवारांना सांगितले की, ज्यांचा फोटो चुकीचा छापला गेला असेल, त्यांनी परीक्षा देण्यासाठी त्यांच्या ओळखपत्रासह केंद्रावर पोहोचावे.
Latest Marathi News सनी लिओनीच्या बनावट ओळखपत्राने गोंधळ Brought to You By : Bharat Live News Media.