दूध खरेदी अनुदान योजनेतील त्रुटी दूर करुन मुदतवाढ द्या : गोपाळराव म्हस्के

पुणे: पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने एक महिन्याकरिता सुरु केलेल्या दूध खरेदी अनुदान योजनेतील सॉफ्टवेअरमधील अडचणी सोडवाव्यात. दूध खरेदी अनुदान योजनेस मुदतवाढ देऊन शेतकर्‍यांना मदत करण्याची मागणी राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. Gopalrao Mhaske एक महिन्याकरिता शासनाने … The post दूध खरेदी अनुदान योजनेतील त्रुटी दूर करुन मुदतवाढ द्या : गोपाळराव म्हस्के appeared first on पुढारी.

दूध खरेदी अनुदान योजनेतील त्रुटी दूर करुन मुदतवाढ द्या : गोपाळराव म्हस्के

पुणे: Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य सरकारने एक महिन्याकरिता सुरु केलेल्या दूध खरेदी अनुदान योजनेतील सॉफ्टवेअरमधील अडचणी सोडवाव्यात. दूध खरेदी अनुदान योजनेस मुदतवाढ देऊन शेतकर्‍यांना मदत करण्याची मागणी राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. Gopalrao Mhaske
एक महिन्याकरिता शासनाने दुधाला प्रति लिटरला 5 रुपये अनुदान योजना जाहिर केली होती. तथापि या योजनेचा कालावधी संपून गेला तरीदेखील दूध उत्पादकांना अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली नाही. हे अनुदान मिळण्यासाठी शासनास सादर करावयाची माहिती भरण्यात शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. आयसीआयसीआय बँकेमार्फत सॉफ्टवेअर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. पंरतु या सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरण्यास अडचणी येत आहेत. Gopalrao Mhaske
शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जी माहिती भरण्यात आलेली आहे व येत आहे, त्यामध्येदेखील त्रुटी आहेत. साहजिकच दूध उत्पादक शेतकर्‍यांना माहिती देण्यास विलंब होत असून पर्यायाने अनुदानाची रक्कमही मिळू शकलेली नाही. त्यामुळे मंत्रालय स्तरावरुन तत्काळ अडचणींचे निराकरण होऊन अनुदान योजनेचा प्रश्न निकाली काढावा, अशीही मागणी म्हस्के यांनी केली आहे.
हेही वाचा 

Co-operative Societies : सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांच्या पॅनेलवर शिक्कामोर्तब; सहकार आयुक्तांच्या प्रस्तावास मान्यता 
पुणे विभागाचा आराखडा तयार; सातार्‍यातील काही आरोग्य केंद्रांत वापर सुरू
पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्षांचे लेटरबॉम्ब : अध्यक्षांवर गंभीर आरोप

Latest Marathi News दूध खरेदी अनुदान योजनेतील त्रुटी दूर करुन मुदतवाढ द्या : गोपाळराव म्हस्के Brought to You By : Bharat Live News Media.