भंडारा : करडी आणि मुंढरी गावात पाण्यावरुन वादाला सुरुवात: पाणीपुरवठा योजना रखडली

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : मोहाडी तालुक्यातील करडी या गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यासाठी नजीकच्या मुंढरी येथील वैनगंगा नदीकाठावर विहिर गरजेची असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. परंतु, विहीर खोदण्यास मुंढरीवासीयांनी विविध कारण समोर करुन विरोध केला आहे. त्यामुळे करडी आणि मुंढरी या दोन गावात पाण्यासाठी कटूता निर्माण झाली आहे. सोबतच पाणीपुरवठा योजनाही रखडली आहे. मोहाडी … The post भंडारा : करडी आणि मुंढरी गावात पाण्यावरुन वादाला सुरुवात: पाणीपुरवठा योजना रखडली appeared first on पुढारी.

भंडारा : करडी आणि मुंढरी गावात पाण्यावरुन वादाला सुरुवात: पाणीपुरवठा योजना रखडली

भंडारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : मोहाडी तालुक्यातील करडी या गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यासाठी नजीकच्या मुंढरी येथील वैनगंगा नदीकाठावर विहिर गरजेची असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. परंतु, विहीर खोदण्यास मुंढरीवासीयांनी विविध कारण समोर करुन विरोध केला आहे. त्यामुळे करडी आणि मुंढरी या दोन गावात पाण्यासाठी कटूता निर्माण झाली आहे. सोबतच पाणीपुरवठा योजनाही रखडली आहे.
मोहाडी तालुक्यातील ६ हजार लोकवस्तीच्या करडी गावाला पाणीपुरवठा करण्याºया विहिरीसाठी मुंढरी (खुर्द) येथील शालिक राऊत यांनी आपल्या मालकीची जागा दान दिली होती. परंतु, त्या योजनेतून पाणीपुरवठा पुरेसा होत नसून गावातील अनेक भागात लोकांना पाण्याविना राहावे लागते.  करडी गावातील सर्व बोरवेल व विहिरींना खारट पाणी असल्यामुळे गावातील पाणी पिण्यायोग्य नाही.
त्यानंतर करडी गावासाठी सन  २०२२ ला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ८ कोटी रुपयांची नवीन नळ योजना मंजूर झाली. त्या योजनेची पाण्याची टाकी, गावात पाईपलाईन आदी कामे पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. परंतु टाकीत येणारे पाणी हे नदीच्या स्त्रोतातून घेणे असल्यामुळे विहीर नदी काठावर खोदणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंढरी (बुज) गावाजवळून वाहणाºया वैनगंगा नदीच्या तीरावरील शासकीय जागेवर विहीर खोदण्याकरता मार्च २०२३ मध्ये काम सुरू करण्यात आले. परंतु मुंढरी (बुज) येथील नागरिकांनी ही जागा दफनभूमी असल्याचे सांगून विहीर खोदण्याचे काम बंद पाडले. तसेच शासकीय जागेवर विहीर खोदू देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर मुंढरी (बुज) येथील पुरुषोत्तम कामथे यांच्या मालकीची जागा विकत घेण्यात आली व त्या जागेवर ९ फेब्रुवारी रोजी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू करण्यात आले. तेव्हा गावातील अनेक लोकांनी काम बंद पाडले. याची सूचना पोलिस स्टेशन करडी येथे देण्यात आली. ठाणेदार मुंढे यांनी गावकºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. ही जागा शासकीय आहे, आम्ही येथे विहीर खोदू देणार नाही, असा पवित्रा घेऊन काम बंद केले. काहीही झाले तरी आम्ही करडीवासीयांना मुंढरी येथून पाणी नेवू देणार नाही, असा सूर निघू लागला आहे. त्यामुळे भविष्यात करडी आणि मुंढरी असा वाद पेटू शकतो.
मुंढरी येथील गावकरी करडीवासीयांना पिण्याच्या पाण्याकरीता विहीर खोदू देत नसतील तर करडीमध्ये मुंढरीवासीयांचे असलेले व्यवसाय बंद करू, असा सूर करडीवासीयांकडून निघू लागला आहे. यावर तोडगा काढून भविष्यात होणारी दोन गावातील कटूता सामंजस्याने सोडवण्यास प्रशासनाने पुढाकार घेऊन शासकीय जागा विहिर खोदण्याकरीता उपलब्ध करून द्यावी व वादावर पडदा पाडावा अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

Latest Marathi News भंडारा : करडी आणि मुंढरी गावात पाण्यावरुन वादाला सुरुवात: पाणीपुरवठा योजना रखडली Brought to You By : Bharat Live News Media.