४०,००० हून अधिकांच्या ‘अंतिम प्रवासाची’ साक्षीदार; जाणून घ्या लक्ष्मी जेना यांच्‍याविषयी

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्वास संपल्यानंतर काही नातेवाईकच अंतिम प्रवासाचे साक्षीदार ठरतात. मात्र त्‍या तब्बल ४०,००० हून अधिक मृतदेहांच्‍या अंतिम प्रवासाची साक्षीदार आहे. गेले काही वर्षे आपल्या पती आणि पाच मुलांसह त्‍या स्मशानभूमी जवळ वास्‍तव्‍यास आहेत. राहत आहे. त्‍यांचे नाव अहे लक्ष्मी जेना. गेले १४ वर्षे ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथे त्‍याचे वास्‍तव्‍य आहे. त्‍याच्‍या … The post ४०,००० हून अधिकांच्या ‘अंतिम प्रवासाची’ साक्षीदार; जाणून घ्या लक्ष्मी जेना यांच्‍याविषयी appeared first on पुढारी.
४०,००० हून अधिकांच्या ‘अंतिम प्रवासाची’ साक्षीदार; जाणून घ्या लक्ष्मी जेना यांच्‍याविषयी


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : श्वास संपल्यानंतर काही नातेवाईकच अंतिम प्रवासाचे साक्षीदार ठरतात. मात्र त्‍या तब्बल ४०,००० हून अधिक मृतदेहांच्‍या अंतिम प्रवासाची साक्षीदार आहे. गेले काही वर्षे आपल्या पती आणि पाच मुलांसह त्‍या स्मशानभूमी जवळ वास्‍तव्‍यास आहेत. राहत आहे. त्‍यांचे नाव अहे लक्ष्मी जेना. गेले १४ वर्षे ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथे त्‍याचे वास्‍तव्‍य आहे. त्‍याच्‍या कार्याचा एक  व्हिडिओ ‘एएनआय’ने शेअर केला आहे. (Laxmi Jena) जाणून घेवूया लक्ष्मी जेना यांच्‍या कार्याविषयी…
Laxmi Jena : एकही पैसा आकारला नाही
लक्ष्मी नवविवाहित हाेत्‍या तेव्हा त्‍यांनी आपल्या पतीला मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पाहिले. या कार्याकडे कशा आल्‍या हे सांगताना त्‍या म्‍हणतात, माझे पती मृतदेहांवर अंतिम संस्काराचे काम करायचे. सुरुवातीला आपल्या पतीला मदत म्हणून हे काम करायला  सुरुवात केली. गेल्‍या १४ वर्षांमध्‍ये त्‍यांनी तब्बल  ४०,००० मृतदेहांचे अंत्‍यंसंस्‍कार  केले आहेत. या कार्यासाठी  एकही पैसा आकारलेला नाही आहे. लोक आनंदाने जे काही देतात त्‍याचा आम्‍ही स्‍वीकार करताे. जे काही करत आहे त्यात समाधानी आहे. देवाने मला जगण्यासाठी आणि माझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी पुरेसे दिले आहे.”

मला भीती वाटत नाही…
या कामाची भीती वाटते का? या प्रश्नावर लक्ष्मी म्‍हणतात की, “नाही, मला भीती वाटत नाही. मला भूत किंवा चेटकिणींची भीती नाही. मी अनेक वर्षांपासून हे करत आहे आणि मला कोणताही विचित्र अनुभव आलेला नाही. लक्ष्‍मी यांनी आपल्या ५ मुलांचे संगोपनासह  घरातील सर्व कामे करत पतीला मदत करतात. या कार्यामुळे त्‍या परिसरात चर्चेत आहे. परिसरात तिचे कौतुक केले जाते. रात्र असो, पावसाळी दिवस असो किंवा काहीही असो त्‍यांनी सन्मानाने अंतिम संस्कार केले आहेत.
Odisha News
 कामाचा आणि त्यागाचा आदर 
मयूरभंज नगरपालिकेचे अध्यक्ष कृष्णानंद मोहंती यांनी सांगितले की, मयूरभंज नगरपालिकेचे चेअरमन कृष्णानंद मोहंती यांनी लक्ष्मी करत असलेल्या कामाबद्दल बोलताना म्हणाले की,” लक्ष्‍मी यांचा पती मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येथे आहे. सध्या पतीच्या आजारपणामुळे त्याचे लक्ष्‍मी करत आहेत. त्‍यांचे कार्य मानवतेला समर्पितआहे. सनातन धर्म, स्त्रिया मृतदेहाच्या अंत्यसंस्कारात भाग घेत नाहीत; पण लक्ष्मी जेना यांनी ४०,००० हून अधिक मृतदेहांचे अंत्यसंस्कार करून एक आदर्श ठेवला आहे. तिचा त्याग आणि सेवेबद्दल संपूर्ण बारीपाडा नगरपालिका तिचा आदर करते.”

#WATCH | Mayurbhaj, Odisha: A woman mortician named Laxmi Jena has cremated more than 40,000 bodies in the last 14 years.
She says, “I have been staying here inside the crematorium ground for the last 14 years with my husband and five children and have cremated more than 40,000… pic.twitter.com/79Dkr6r8Fb
— ANI (@ANI) February 18, 2024

हेही वाचा 

Suhani Bhatnagar Passes Away : ‘दंगल गर्ल’ सुहानीची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, १९ व्या वर्षी निधन
SSC HSC Board Exam : टेन्शन काय कु लेताय रे… बोर्डाच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यी आणि पालकांनी अशी घ्या काळजी
मोठी बातमी : नंदुरबारमध्ये १५० डुक्करांचा आफ्रिकन स्वाईन फिवरने मृत्यू; डुक्करांची कत्तल करण्याचे आदेश

The post ४०,००० हून अधिकांच्या ‘अंतिम प्रवासाची’ साक्षीदार; जाणून घ्या लक्ष्मी जेना यांच्‍याविषयी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source