२८ धावांवर इंग्लंडला चौथा धक्का

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला जात आहे. भारताने आपला दुसरा डाव ४३०/४ धावांवर घोषित केला आहे. निरंजन शाह स्टेडियमवर इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. (IND vs ENG 3rd Test) … The post २८ धावांवर इंग्लंडला चौथा धक्का appeared first on पुढारी.

२८ धावांवर इंग्लंडला चौथा धक्का

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला जात आहे. भारताने आपला दुसरा डाव ४३०/४ धावांवर घोषित केला आहे. निरंजन शाह स्टेडियमवर इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. (IND vs ENG 3rd Test)
२८ धावांवर इंग्लंडला चौथा धक्का
इंग्लंडला २८ च्या स्कोअरवर चौथा धक्का बसला. पोपला बाद केल्यानंतर जडेजाने जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बेअरस्टोला चार धावा करता आल्या. सध्या जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स क्रीजवर आहेत. १३ षटकापर्यंत इंग्लडची धावसंख्या ४ बाद ३२ धावा आहेत.
इंग्लंडला तिसरा धक्का, ओली पोप झेलबाद
२० धावांवर इंग्लंडला तिसरा धक्का बसला. जडेजाने ओली पोपला स्लिपमध्ये रोहितकरवी झेलबाद केले. त्याला तीन धावा करता आल्या. अश्विनही चहापानानंतर मैदानात परतला. यामुळे टीम इंडियाची गोलंदाजी मजबूत झाली आहे.
चहापानापर्यंत इंग्लंडच्या २ बाद १८ धावा
चौथ्या दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडची धावसंख्या २ बाद १८ धावा आहेत. ५५७ धावांचे इंग्लडला लक्ष्य आहे, डकेट आणि क्रोली पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. इंग्लंडला पहिला धक्का १५ धावांवरच बसला. यष्टिरक्षक ध्रुव जुरेलच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे भारताने डकेटला धावबाद केले. डकेटला चार धावा करता आल्या.
यशस्वी जैस्वाल 214 धावा करून नाबाद माघारी परतला आणि सर्फराज खानने 68 धावा केल्या. शुभमन गिल ९१ धावा करून बाद झाला. पहिल्या डावात भारताने 445 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडने 319 धावा केल्या होत्या.
जैस्वालचे ‘अभूतपूर्व’ यश
इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या यशस्वी जैस्वालने अनोख्या पराक्रम आपल्या नावावर केला. जैस्वालने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले होते. यानंतर त्याने मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही धडाकेबाज द्विशतकी खेळी केली.एकाच कसोटी मालिकेत दोन द्विशतके झळकवण्याच्या पराक्रम त्‍याने केला आहे. या खेळीत त्याने २३१ चेंडूमध्ये १४ चौकार आणि १० षटकार लगावले. या शानदार खेळीसह त्यान सर्फराज खानसोबत पाचव्या विकेटसाठी १४० धावांची भागिदारी केली.
सर्फराजचे ६५ चेंडूत अर्धशतक
इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सर्फराजने ६५ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला
जैस्वालचे ‘यशस्वी’ दीड शतक
इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताच्या यशस्वी जैस्वालने आपले दीड शतक साजरे केले. त्याने १९२ चेंडूत आपले दीड शतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ७ षटकार लगावले. यासह त्याने सर्फराज खानसोबत पाचव्या विकेटसाठी ६८ चेंडूत ६३ धावांची भागिदारी केली आहे
चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारत ४ बाद ३१४
चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने चार गडी गमावून 314 धावा केल्या होत्या. सध्या यशस्वी जैस्वाल 149 धावांवर तर सर्फराज 22 धावांवर खेळत आहे. दोघांनीही तुफानी फलंदाजी करत 62 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली आहे. टीम इंडियाकडे आतापर्यंत एकूण 440 धावांची आघाडी आहे. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. यावेळी भारताकडे 126 धावांची आघाडी होती.
भारताने शनिवारीच रोहित शर्मा (19) आणि रजत पाटीदार (0) यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्याचवेळी शुभमन गिलसोबत 155 धावांची भागीदारी केल्यानंतर यशस्वी जैस्वाल पाठदुखीमुळे निवृत्त झाला होता. आज रविवारी भारताला पहिला धक्का शुभमन गिलच्या रूपाने बसला. तो धावबाद झाला आणि नऊ धावांनी शतक हुकले. गिल ९१ धावा करू शकला. त्याने कुलदीप यादवसोबत ५५ धावांची भागीदारी केली. यानंतर यशस्वी मैदानात आला. कुलदीपने 27 धावांची छोटी पण उपयुक्त खेळी खेळली. त्यानंतर यशस्वी आणि सरफराज यांनी एकही विकेट पडू दिली नाही.
भारताला चौथा धक्का; कुलदीप यादव बाद
258 धावांवर भारताला चौथा धक्का बसला. कुलदीप यादव २७ धावा करून बाद झाला. त्याला रेहान अहमदने रूटकरवी झेलबाद केले. सध्या यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान क्रीजवर आहेत. भारताची आघाडी 384 धावांवर पोहोचली आहे. तत्पूर्वी, शुभमन गिल ९१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारताला तिसरा धक्का; गिल बाद
टीम इंडियाला 246 धावांवर तिसरा धक्का बसला. भारताला आज पहिला धक्का बसला आहे. रोहित आणि रजत शनिवारी पॅव्हेलियनमध्ये परतले. शुभमन गिल ९१ धावा करून धावबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 151 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 91 धावा केल्या.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात 196 धावांनी पुढे खेळत आहे. सध्या कुलदीप यादव चार धावा तर, शुभमन गिल 67 धावा करून क्रीजवर आहेत. यामुळे भारताने 320 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
भारताकडे 322 धावांची आघाडी
इंग्लंडकडून जो रूट आणि टॉम हार्टले यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी आतापर्यंत 322 धावांची झाली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला होता. पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाला दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी मिळाली. (IND vs ENG 3rd Test)
यशस्वीच्या पाठीत दुखापत
पाठदुखीमुळे 133 चेंडूत 104 धावा केल्यानंतर यशस्वी जैस्वाल दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. त्याने आतापर्यंतच्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले आहेत. तो पुढे फलंदाजीला येणार की नाही याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
शुभमन-कुलदीप क्रीजवर
भारताने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 196 धावा केल्या आहेत. सध्या कुलदीप यादव तीन धावांवर नाबाद असून शुभमन गिल ६५ धावांवर नाबाद आहे. रोहित (19) आणि रजत पाटीदार (0) यांच्या रूपाने भारताला दोन धक्के बसले.

2⃣0⃣0⃣ up for #TeamIndia
The lead now over 325 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5X8M#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/77pHP9HjyU
— BCCI (@BCCI) February 18, 2024

हेही वाचा :

कोल्हापूर : कुटुंबीयांच्या विरोधामुळे रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमी युगुलाने जीवनयात्रा संपविली
Acharya Vidyasagar Maharaj : जैन मुनी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे निर्वाण
महाराणी येसुबाईंची समाधी संरक्षित स्मारक

The post २८ धावांवर इंग्लंडला चौथा धक्का appeared first on Bharat Live News Media.