Crime News : दौंडमधील चोरीप्रकरणी आरोपीस अटक दोन

दौंड : पुढारी वृत्तसेवा : बांधकाम सुरू असलेल्या घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून बांधकामाचे साहित्य व जुने मोबाईल असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरणार्‍यांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील स्टेट बँकेच्या पाठीमागील घरातील चोरीप्रकरणी दि.8 रोजी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या … The post Crime News : दौंडमधील चोरीप्रकरणी आरोपीस अटक दोन appeared first on पुढारी.

Crime News : दौंडमधील चोरीप्रकरणी आरोपीस अटक दोन

दौंड : Bharat Live News Media वृत्तसेवा : बांधकाम सुरू असलेल्या घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून बांधकामाचे साहित्य व जुने मोबाईल असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरणार्‍यांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील स्टेट बँकेच्या पाठीमागील घरातील चोरीप्रकरणी दि.8 रोजी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. खबर्‍यामार्फत दौंड पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली होती.
त्यानुसार राहुल नागेश गायकवाड (रा. भीमनगर, दौंड) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मित्र व दोन विधिसंघर्षित बालकांसह चोरी केल्याची कबुली दिली. दौंड पोलिसांनी त्यांच्याकडून 70 हजार रुपयांच्या वस्तू जप्त केल्या. अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या नातेवाईकांना समज देण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक यादव, गुन्हे शोध पथकाचे सुभाष राऊत, नितीन बोराडे, विजय पवार, शरद वारे, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते आदींनी केली. तपास हवालदार किरण पांढरे करीत आहेत.
पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे
या गुन्ह्यात दोन लहान मुलांचा सहभाग निष्पन्न झाला. त्यामुळे पालकांनी आपली मुले शाळेत जातात का, ती कोणाच्या संगतीत आहेत, काय करतात, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
हेही वाचा

Nashik | अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक
हिंगणी गाडा नळ पाणीपुरवठा योजनेत सावळागोंधळ
एका विचाराच्या सत्तेने पुणेकरांचे आयुष्य सुधारले नाही : सुप्रिया सुळे

Latest Marathi News Crime News : दौंडमधील चोरीप्रकरणी आरोपीस अटक दोन Brought to You By : Bharat Live News Media.