भाजपकडून आम्ही 2024 ची विधानसभा लढणारच : अंकिता पाटील-ठाकरे

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : काहींना वाटत असेल नवी दिल्ली येथील साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्षपद माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिल्याने आम्हाला इथे सगळे मोकळे झाले. मात्र, तसे होणार नाही. आम्ही इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सन 2024 ची निवडणूक भाजपकडून 100 टक्के लढणार असल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता … The post भाजपकडून आम्ही 2024 ची विधानसभा लढणारच : अंकिता पाटील-ठाकरे appeared first on पुढारी.

भाजपकडून आम्ही 2024 ची विधानसभा लढणारच : अंकिता पाटील-ठाकरे

इंदापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : काहींना वाटत असेल नवी दिल्ली येथील साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्षपद माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिल्याने आम्हाला इथे सगळे मोकळे झाले. मात्र, तसे होणार नाही. आम्ही इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सन 2024 ची निवडणूक भाजपकडून 100 टक्के लढणार असल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे आणि पाटील यांचे पुत्र तसेच भाजप कोअर कमिटीचे तालुकाप्रमुख राजवर्धन पाटील यांनी केला. शनिवारी (दि. 17) पाटील भावंडांनी पत्रकार परिषद घेऊन आपले इरादे स्पष्ट केले. यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघात पुन्हा ’पाटील विरुद्ध पवार’ असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे.
पाटील भावंडे म्हणाली, आम्ही पूर्वी महाआघाडीत होतो, आता महायुतीमध्ये आहोत. आघाडीत असताना तीनही वेळेस त्यांनी आमची फसवणूक केलेली असून, आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे जे विधानसभेला आमचे काम करतील, त्यांचेच काम आम्ही लोकसभेला करू तसेच 2024 ची विधानसभा आम्ही लढणारच आहोत, असे राजवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा उमेदवार जो असेल त्याचेच काम करावे लागेल, असे सातत्याने म्हणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच जवळपास उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र, पाटील भावंडांच्या या दाव्यामुळे बारामती मतदारसंघात महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी जर तुम्हाला विधानसभेला मदत करतो, असा शब्द देत लोकसभेला मदतीचे आवाहन केले तर काय करणार? या प्रश्नावर राजवर्धन पाटील म्हणाले की, ते सन 2009 पासून केवळ शब्दच देत आलेत. शब्दाला प्रत्यक्ष कृतीची जोड हवी. त्यांनी आत्ताच त्यांची भूमिका जाहीर करावी. मात्र, निवडणुकीस आणखी बराच वेळ आहे, असे म्हणत राजवर्धन यांनी स्पष्ट केले की, जर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला लोकसभेची उमेदवारी मिळाली, तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आणि त्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट करणार. कारण, यापूर्वी अनेकवेळा यांनी शब्द देऊन फिरविला आहे. त्यामुळे या वेळेस आम्ही या कोंडीमध्ये फसणार नाही. त्यामुळे उमेदवार जाहीर झाल्यानंतर पुढील भूमिका घेऊ, असेही पाटील भावंडांनी शेवटी स्पष्ट केले.
हेही वाचा

एका विचाराच्या सत्तेने पुणेकरांचे आयुष्य सुधारले नाही : सुप्रिया सुळे
आवश्यक तिथे इंग्रजी शाळांमध्ये आरटीई प्रवेश : शिक्षण आयुक्त सुरज मांढरे
प्रौढांसाठी बीसीजी लसीकरण लवकरच : डॉ. नितीन अंबाडेकर

Latest Marathi News भाजपकडून आम्ही 2024 ची विधानसभा लढणारच : अंकिता पाटील-ठाकरे Brought to You By : Bharat Live News Media.