Crime News : ससूनमधून पळालेला मार्शल सापडला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला अखेर सायबर पोलिसांनी पकडले आहे. शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील तो आरोपी आहे. शुक्रवारी (दि.16) रात्री तो मावशीच्या घरी आश्रयाला आला होता. मात्र, पोलिसांनी अगोदरच मावशीच्या घरी सापळा रचून ठेवला होता. सायबर पोलिसांचे एक पथक मावशीच्या घरात, तर दुसरे घराच्या बाहेर पहारा … The post Crime News : ससूनमधून पळालेला मार्शल सापडला appeared first on पुढारी.

Crime News : ससूनमधून पळालेला मार्शल सापडला

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला अखेर सायबर पोलिसांनी पकडले आहे. शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील तो आरोपी आहे. शुक्रवारी (दि.16) रात्री तो मावशीच्या घरी आश्रयाला आला होता. मात्र, पोलिसांनी अगोदरच मावशीच्या घरी सापळा रचून ठेवला होता. सायबर पोलिसांचे एक पथक मावशीच्या घरात, तर दुसरे घराच्या बाहेर पहारा देत होते. तो घरात येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
मार्शल लुईस लीलाकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता मार्शलने तेथून पळ काढला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात मार्शलच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर कर्तव्यात हलगर्जी केल्यामुळे सायबर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.
हेही वाचा

लालमहालात रंगला मर्दानी खेळ : दांडपट्टा, तलवार, या कलागुणांचे सादरीकरण
Nashik Crime News | गंगापूर गावात टवाळखोरांची वरात
पोलिसांचे लुटारू त्रिकूट बडतर्फ!

Latest Marathi News Crime News : ससूनमधून पळालेला मार्शल सापडला Brought to You By : Bharat Live News Media.