लालमहालात रंगला मर्दानी खेळ : दांडपट्टा, तलवार, या कलागुणांचे सादरीकरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती आयोजित शिवमहोत्सवाच्या तिसर्‍या दिवसाच्या सत्रात शिवकालीन मर्दानी खेळ रंगला. कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, माधवराव वडघुले यांच्या हस्ते करण्यात आले. याद्वारे मर्दानी मावळे वयवर्षे पाच ते चाळीस वयोगटातील मुले व जिजाऊंच्या लेकींचा ‘झंझावात’ शिवप्रेमींना पाहता आला. लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार, भाला, विटा, फरीगदगा, … The post लालमहालात रंगला मर्दानी खेळ : दांडपट्टा, तलवार, या कलागुणांचे सादरीकरण appeared first on पुढारी.

लालमहालात रंगला मर्दानी खेळ : दांडपट्टा, तलवार, या कलागुणांचे सादरीकरण

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती आयोजित शिवमहोत्सवाच्या तिसर्‍या दिवसाच्या सत्रात शिवकालीन मर्दानी खेळ रंगला. कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, माधवराव वडघुले यांच्या हस्ते करण्यात आले. याद्वारे मर्दानी मावळे वयवर्षे पाच ते चाळीस वयोगटातील मुले व जिजाऊंच्या लेकींचा ‘झंझावात’ शिवप्रेमींना पाहता आला. लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार, भाला, विटा, फरीगदगा, सुरुळ, लिंबू काढणी अचूकपणे दोन तुकडे करणे यांचेे सादरीकरण केले.
मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्याचे कार्य छत्रपती शिवाजीराजे मर्दानी आखाडा, छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथील विजय आयवळे पाटील, विनायक सुतार, वैभव मोहोळ, राहुल मोहिते यांनी सुरू केले आहे. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे प्रशांत धुमाळ, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, विराज तावरे, तानाजी शिरोळे, मुकेश यादव उपस्थित होते. संयोजन अक्षय रणपिसे, सचिन जोशी, अक्षय देसाई, मंदार बहिरट, युवराज ढवळे, जयंत गायकवाड, नीलेश इंगवले, अभिषेक वडघुले यांनी केले.
हेही वाचा

Nashik Crime News | गंगापूर गावात टवाळखोरांची वरात
अर्थकारण : श्वेतपत्रिकेचा वाद
कृषी : पुन्हा बळीराजाचा एल्गार

Latest Marathi News लालमहालात रंगला मर्दानी खेळ : दांडपट्टा, तलवार, या कलागुणांचे सादरीकरण Brought to You By : Bharat Live News Media.