IND vs ENG 3rd Test : भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. हा सामना रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. सध्या भारताचा दुसरा डाव सुरू आहे. (IND vs ENG 3rd Test)
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात 196 धावांनी पुढे खेळत आहे. सध्या कुलदीप यादव चार धावा तर, शुभमन गिल 67 धावा करून क्रीजवर आहेत. यामुळे भारताने 320 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.
भारताकडे 322 धावांची आघाडी
इंग्लंडकडून जो रूट आणि टॉम हार्टले यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी आतापर्यंत 322 धावांची झाली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला होता. पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाला दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी मिळाली. (IND vs ENG 3rd Test)
यशस्वीच्या पाठीत दुखापत
पाठदुखीमुळे 133 चेंडूत 104 धावा केल्यानंतर यशस्वी जैस्वाल दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. त्याने आतापर्यंतच्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले आहेत. तो पुढे फलंदाजीला येणार की नाही याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
शुभमन-कुलदीप क्रीजवर
भारताने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 196 धावा केल्या आहेत. सध्या कुलदीप यादव तीन धावांवर नाबाद असून शुभमन गिल ६५ धावांवर नाबाद आहे. रोहित (19) आणि रजत पाटीदार (0) यांच्या रूपाने भारताला दोन धक्के बसले.
2⃣0⃣0⃣ up for #TeamIndia
The lead now over 325 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5X8M#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/77pHP9HjyU
— BCCI (@BCCI) February 18, 2024
हेही वाचा :
कोल्हापूर : कुटुंबीयांच्या विरोधामुळे रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमी युगुलाने जीवनयात्रा संपविली
Acharya Vidyasagar Maharaj : जैन मुनी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे निर्वाण
महाराणी येसुबाईंची समाधी संरक्षित स्मारक
Latest Marathi News IND vs ENG 3rd Test : भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा Brought to You By : Bharat Live News Media.
