उद्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम : राज्यात 1 लाख शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीनता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 19 फेब्रुवारी ते 4 मार्चदरम्यान राज्यात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत 1 लाख रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र … The post उद्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम : राज्यात 1 लाख शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट appeared first on पुढारी.

उद्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम : राज्यात 1 लाख शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीनता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 19 फेब्रुवारी ते 4 मार्चदरम्यान राज्यात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत 1 लाख रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ ही विशेष मोहीम जून, 2022 पासून राबवण्यात येत आहे.
या मोहिमेत 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत 2022 ते 2025 या तीन वर्षांत 27 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेमुळे नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे. शासकीय रुग्णालय, मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
गतवर्षी 67.30 टक्के शस्त्रक्रिया
2022-23 मध्ये राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे 112.51 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले. 2023-24 या आर्थिक वर्षात डिसेंबर, 2023 पर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 67.30 टक्के मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 2023-24 या आर्थिक वर्षातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 या कालावधीत जिल्हास्तरावर विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात
येणार आहे.
हेही वाचा

राष्ट्रीय महामार्ग विभागामुळे शासनाचा भूसंपादन निधी वाचणार
Lonavala : प्रदेश काँग्रेसच्या शिबिराचा समारोप
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 77 अधिकार्‍यांच्या बदल्या

Latest Marathi News उद्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम : राज्यात 1 लाख शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट Brought to You By : Bharat Live News Media.