‘मुस्कुराइए…! रोहित-विराटला पीएम मोदींनी दिला धीर, शमीची गळाभेट, पाहा VIDEO

अहमदाबाद; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाकडून २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेला पराभव भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. तिथे त्यांनी खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची गळाभेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल … The post ‘मुस्कुराइए…! रोहित-विराटला पीएम मोदींनी दिला धीर, शमीची गळाभेट, पाहा VIDEO appeared first on पुढारी.
‘मुस्कुराइए…! रोहित-विराटला पीएम मोदींनी दिला धीर, शमीची गळाभेट, पाहा VIDEO


अहमदाबाद; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाकडून २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेला पराभव भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. तिथे त्यांनी खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची गळाभेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (PM Modi met Team India)
संबंधित बातम्या : 

सूर्यकुमार यादव भारताचा नवा कर्णधार; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
आर. अश्विनने ऑस्ट्रेलियासाठी वाजवल्या टाळ्या, म्हणाला…
टीम इंडिया मागील पानावरुन पुढे..! १० वर्ष…ICC १० ट्रॉफी…विजेतेपद शून्‍य

अंतिम लढतीतील ४३ व्या षटकात शेवटच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने दोन धावा काढताच कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. पराभवानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. कर्णधार रोहित शर्मा लगेच ड्रेसिंग रूममध्ये गेला. मोहम्मद सिराज मैदानावरच रडू लागला. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदीही अहमदाबादला पोहोचले होते.
अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडिया मानसिक धक्क्यात गेली. नेमके त्याच वेळी पंतप्रधान मोदी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले आणि त्यांनी सर्वच खेळाडूंना दिलासा दिला. (PM Modi met Team India)
रोहित आणि विराटचा हात हातात घेत पीएम मोदी त्यांना, ‘मुस्कुराइए भाई, देश आपको देख रहा है।’ असे म्हणाले.

#WATCH | Prime Minister Narendra Modi met Team India in their dressing room after the ICC World Cup Finals at Narendra Modi Stadium in Ahmedabad, Gujarat on 19th November.
The PM spoke to the players and encouraged them for their performance throughout the tournament.
(Video:… pic.twitter.com/ZqYIakoIIj
— ANI (@ANI) November 21, 2023

हेही वाचा : 

टीम इंडिया पुन्हा ऑस्ट्रेलियाला भिडणार! 2 दिवसांनी पुन्हा…
ICCने निवडला वर्ल्डकपचा सर्वोत्कृष्ट संघ, रोहित बनला ‘कॅप्टन’
विजयाचा उन्माद आणि बेधुंदी..! ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचे संतापजनक वर्तन

The post ‘मुस्कुराइए…! रोहित-विराटला पीएम मोदींनी दिला धीर, शमीची गळाभेट, पाहा VIDEO appeared first on पुढारी.

अहमदाबाद; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाकडून २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेला पराभव भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. तिथे त्यांनी खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची गळाभेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल …

The post ‘मुस्कुराइए…! रोहित-विराटला पीएम मोदींनी दिला धीर, शमीची गळाभेट, पाहा VIDEO appeared first on पुढारी.

Go to Source