नाशिकमध्ये जुने छत कोसळून वृद्ध ठार
नाशिकरोड; पुढारी वृत्तसेवा : शहर व उपनगरांमध्ये अपघाताचे सत्र सुरुच आहे. उपनगर येथे बांधकाम सुरू असताना आज (दि. २०) सकाळी जुने छत कोसळून वृद्धाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मधुकर यादवराव बोंबडे (५९, प्लॅट नं. ३०३, श्रेयस पार्क, अशोका शाळेजवळ, चांदसी) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जेलरोड, उपनगर येथील प्रियंका बंगला येथे अनमोल कैलास केडिया यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरु आहे. मधुकर बोंबडे हे आज (दि. २०) अनमोल केडिया यांच्या बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी गेले होते. काम सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास जुन्या घराचे लाकडी छत अचानक बोबडे यांच्या अंगावर पडले. त्यात मधुकर बोंबडे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. भाचा बलभीम शेळके याने बाेंबडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उपनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद झाली आहे.
The post नाशिकमध्ये जुने छत कोसळून वृद्ध ठार appeared first on पुढारी.
नाशिकरोड; पुढारी वृत्तसेवा : शहर व उपनगरांमध्ये अपघाताचे सत्र सुरुच आहे. उपनगर येथे बांधकाम सुरू असताना आज (दि. २०) सकाळी जुने छत कोसळून वृद्धाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मधुकर यादवराव बोंबडे (५९, प्लॅट नं. ३०३, श्रेयस पार्क, अशोका शाळेजवळ, चांदसी) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी …
The post नाशिकमध्ये जुने छत कोसळून वृद्ध ठार appeared first on पुढारी.