ब्रेकिंग: इस्रोच्या ‘हवामान’ उपग्रह INSAT-3DS चे यशस्वी प्रक्षेपण

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) INSAT-3DS या हवामान उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आंध्र-प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून आज (दि.१७) सायंकाळी ५.३५ वाजता INSAT-3DS हा उपग्रह GSLV-F14 रॉकेटच्या सहाय्याने यशस्वीपणे प्रक्षेपित झाला. या वर्षातील इस्रोची ही दुसरी महत्त्वपूर्ण मोहिम आहे. भारतीय हवामान आणि नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती मिळावी, यासाठी इस्रोकडून ही मोहीम आखण्यात आली … The post ब्रेकिंग: इस्रोच्या ‘हवामान’ उपग्रह INSAT-3DS चे यशस्वी प्रक्षेपण appeared first on पुढारी.
ब्रेकिंग: इस्रोच्या ‘हवामान’ उपग्रह INSAT-3DS चे यशस्वी प्रक्षेपण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) INSAT-3DS या हवामान उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आंध्र-प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून आज (दि.१७) सायंकाळी ५.३५ वाजता INSAT-3DS हा उपग्रह GSLV-F14 रॉकेटच्या सहाय्याने यशस्वीपणे प्रक्षेपित झाला. या वर्षातील इस्रोची ही दुसरी महत्त्वपूर्ण मोहिम आहे. भारतीय हवामान आणि नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती मिळावी, यासाठी इस्रोकडून ही मोहीम आखण्यात आली आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे. (ISRO INSAT-3DS Mission)
 GSLV-F14  या वाहनाने INSAT-3DS या हवामानविषयक उपग्रहाला अपेक्षित जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या ठेवले आहे, अशी माहिती इस्रोने एक्स पोस्ट करत दिली आहे. हवामानविषयक निरीक्षणे, हवामान अंदाज आणि आपत्ती चेतावणीसाठी जमीन आणि महासागराच्या पृष्ठभागाचे निरीक्षण आणि उपग्रह सहाय्यित शोध आणि बचाव सेवा प्रदान करण्यासाठी विद्यमान कार्यरत INSAT-3D आणि INSAT-3DR उपग्रहांद्वारे प्रदान केलेल्या सेवांची सातत्य सुनिश्चित करणे हे मिशनचे उद्दिष्ट आहे, असेही इस्रोने म्हटले आहे.

GSLV-F14/INSAT-3DS Mission:
The vehicle has successfully placed the satellite into the intended geosynchronous transfer orbit. @moesgoi #INSAT3DS
— ISRO (@isro) February 17, 2024

एक्सपोसॅट (XPoSat); या वर्षातील पहिला उपग्रह प्रक्षेपित
यापूर्वी इस्रोने १ जानेवारी, २०२४ रोजी एक्सपोसॅट (XPoSat) या वर्षातील पहिला उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. कृष्णविवरांचा अभ्यास (black holes) करण्यासाठी हा उपग्रह अंतराळात पाठवण्यात आला होता. यामध्ये PSLV-C58 रॉकेटचा वापर करून‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाचे प्रक्षेपण केले. हे दोन्ही उपग्रह आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले आहेत. (ISRO INSAT-3DS Mission)

#WATCH | Andhra Pradesh: ISRO launches INSAT-3DS meteorological satellite onboard a Geosynchronous Launch Vehicle F14 (GSLV-F14), from Satish Dhawan Space Centre in Sriharikota.
(Source: ISRO) pic.twitter.com/kQ5LuK975z
— ANI (@ANI) February 17, 2024

#WATCH | Andhra Pradesh: The second stage performance is Normal and the payload bearing has also been separated as ISRO launched INSAT-3DS meteorological satellite onboard a Geosynchronous Launch Vehicle F14 (GSLV-F14).
(Source: ISRO) pic.twitter.com/V0QJvAVoRC
— ANI (@ANI) February 17, 2024

INSAT मालिकेतील हा तिसरा उपग्रह प्रक्षेपित
GSLV F14 रॉकेटद्वारे INSAT-3DS हा हवामान उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत ठेवेला जाणार आहे. INSAT-3DS हा उपग्रह इन्सॅट मालिकेतील प्रक्षेपित केला जाणारा तिसरा उपग्रह आहे. हवामान आणि नैसर्गिक आपत्तींच्या अचूक माहितीसाठी ही मोहिम सुरू करण्यात येत आहे. हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालयासाठी तयार करण्यात आला असून, मोहिमेचा संपूर्ण खर्च भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केला आहे.  हे प्रक्षेपण अंतराळाच्या जगात भारताच्या वाढत्या वर्चस्वाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. (ISRO INSAT-3DS Mission)
हवामान संस्थांसाठी महत्त्वाचा उपग्रह
INSAT-3DS हा हवामानविषयक उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल, ज्यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल, तसेच नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक चांगले अंदाज येण्यास मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती अगोदर मिळाल्यावर त्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे भारतीय हवामान संस्थांसाठी हा हवामान उपग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
INSAT-3DS चे ‘नॉटी बॉय’ मधून प्रक्षेपण
हवामान उपग्रह INSAT-3DS ज्या उपग्रहातून प्रक्षेपित केला  त्या GSLV F14 रॉकेटला ‘नॉटी बॉय’ असेही म्हणतात. याचाच अर्थ खोडकर मुलगा असा आहे. GSLV F14 चे हे १६ वे मिशन असणार आहे. यापूर्वी GSLV F14 द्वारे प्रक्षेपित केलेल्या ४० टक्के मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत. ISRO ने सांगितले की आज प्रक्षेपित होणारा हवामान उपग्रह INSAT-3DS 2013 मध्ये प्रक्षेपित केलेल्या हवामान उपग्रह INSAT-3D ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. हा उपग्रह हवामानाची सविस्‍तर माहिती प्रदान करेल, असा विश्वास देखील भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोन व्यक्त केला आहे.

ISRO launches INSAT-3DS meteorological satellite onboard a Geosynchronous Launch Vehicle F14 (GSLV-F14), from Satish Dhawan Space Centre in Sriharikota. pic.twitter.com/HHDdGVH7mO
— ANI (@ANI) February 17, 2024

हेही वाचा:

ISRO INSAT-3DS Mission : हवामान उपग्रह INSAT-3DS प्रक्षेपणासाठी ISRO सज्ज; जाणून घ्या ‘या’ मोहिमेविषयी
INSAT-3DS | हवामान उपग्रहाच्या प्रक्षेपणापूर्वी इस्रो प्रमुखांची मंदिरात प्रार्थना
XPoSat Mission | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रक्षेपित ISRO च्या मोहिमेचे आणखी एक यश; XSPECT पेलोडने सुपरनोव्हा अवशेषातून पहिला प्रकाश टिपला

 
Latest Marathi News ब्रेकिंग: इस्रोच्या ‘हवामान’ उपग्रह INSAT-3DS चे यशस्वी प्रक्षेपण Brought to You By : Bharat Live News Media.