कोरोना लसीमुळे आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका झाला कमी! ICMR चे नवे संशोधन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोरोना प्रतिबंधक लसीमुळे तरुणांमधील आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका कमी झाला, असा निष्‍कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या संशोधनातून काढण्‍यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे (Covid vaccines) आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका वाढतो, अशी चर्चा होत होती. मात्र उलट भारतीय तरुणांमध्‍ये कोरोना प्रतिबंधक लस घेतल्‍यामुळे मृत्‍यूचा धोका कमी झाल्‍याचे नवे संशोधन सांगते. ( … The post कोरोना लसीमुळे आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका झाला कमी! ICMR चे नवे संशोधन appeared first on पुढारी.

कोरोना लसीमुळे आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका झाला कमी! ICMR चे नवे संशोधन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोरोना प्रतिबंधक लसीमुळे तरुणांमधील आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका कमी झाला, असा निष्‍कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या संशोधनातून काढण्‍यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे (Covid vaccines) आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका वाढतो, अशी चर्चा होत होती. मात्र उलट भारतीय तरुणांमध्‍ये कोरोना प्रतिबंधक लस घेतल्‍यामुळे मृत्‍यूचा धोका कमी झाल्‍याचे नवे संशोधन सांगते. ( Covid vaccines reduced risk of sudden death : ICMR study )
ICMR study : कसे झाले संशोधन ?
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने १ ऑक्‍टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत १८ ते ४५ वयोगटातील लोकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या वयोगटातील ७२९ निरोगी व्‍यक्‍तीचा आकस्‍मिक मृत्‍यू कशामुळे त्‍याचा अभ्‍यास करण्‍यात आला. सर्वसमावेशक अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, कोरोना प्रतिबंधक लसीकरणा त्‍या काळात भारतातील तरुणांमध्‍ये आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका वाढला नाही तर लसीचा किमान एक डोस घेतल्यास अशा मृत्यूची शक्यताा कमी झाली. तसेच ज्‍यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस मिळाले आहेत त्यांना अस्पष्ट अचानक मृत्यू अनुभवण्याची शक्यता कमी होती, तर एकाच डोसचा समान संरक्षणात्मक परिणाम होत नाही.

(1/2) ICMR’s research study exploring the causes of the anecdotal reports of sudden deaths in healthy young adults is now published.
Here are the key findings (read in thread). Link to the study:https://t.co/KUnsSu0sbe
— ICMR (@ICMRDELHI) November 21, 2023

ICMR study : आकस्‍मिक मृत्‍यूची कोणती कारणे आढळली
कोरोना प्रतिबंधक लसीमुळे तरुणांमध्‍ये आकस्‍मिक मृत्‍यू होत आहे, असा एक गैरसमज होता. या चर्चेला कोणाताही शास्‍त्रीय आधार नव्‍हता. आता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्‍या अभ्‍यासात आकस्‍मिक मृत्‍यू झालेल्‍यांच्‍या आरोग्‍याच्‍या आनुवंशिक समस्‍या, अति मद्यपान, औषधांचा अतिरिक्‍त डोस, तसेच मृत्‍यूपूर्वी ४८ तास अति तीव्रतेच्‍या शारीरिक हालचालींचा समावेश असल्‍याचे निदर्शनास आले आहे.

(1/2) •COVID19 vaccination didn’t increase risk of sudden deaths; it actually reduced the risk.
• Past COVID-19 hospitalization, family history of sudden deaths, binge alcohol drinking, intense unaccustomed activity was associated with higher risk of sudden death. pic.twitter.com/j0ZnLTJvBb
— ICMR (@ICMRDELHI) November 21, 2023

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिला होता ‘हा’ सल्‍ला
हृदयविकाराने होणार्‍या मृत्‍यूंचा कोरोनाशी संबंध आहे का? या प्रश्‍नावर केंद्रीय आरोग्‍य मंत्री मनसुख मांडविया इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अभ्यासाचा हवाला देत सल्‍ला दिला होता. ते म्‍हणाले होते की, आयसीएमआरने हृदयविकाराने होणार्‍या मृत्‍यूंचा कोरोनाशी संबंध आहे का? यावर सविस्तर अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार ज्यांना कोरोना संसर्गाचा अधिक त्रास सहन करावा लागला आहे त्‍यांनी जास्त मेहनत करू नये. त्यांनी अधिक शारीरिक परीश्रम , धावणे आणि अति व्यायामापासून थोड्या काळासाठी दूर राहावे. किमान एक किंवा दोन वर्षे अति शारीरिक श्रमापासून लांब राहावे, म्हणजे हृदयविकाराचा झटका टाळता येईल.”
हेही वाचा :

Sanjay Gadhvi : धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे हार्ट अॅटॅकने निधन
लसीकरण झालं नाही तर काेराेनाचे असे व्हेरियंट येतच राहतील : युएन प्रमुख
Walk Exercise : तुम्‍ही दररोज किती पावले चालता? जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सांगते…

 
The post कोरोना लसीमुळे आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका झाला कमी! ICMR चे नवे संशोधन appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोरोना प्रतिबंधक लसीमुळे तरुणांमधील आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका कमी झाला, असा निष्‍कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या संशोधनातून काढण्‍यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे (Covid vaccines) आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका वाढतो, अशी चर्चा होत होती. मात्र उलट भारतीय तरुणांमध्‍ये कोरोना प्रतिबंधक लस घेतल्‍यामुळे मृत्‍यूचा धोका कमी झाल्‍याचे नवे संशोधन सांगते. ( …

The post कोरोना लसीमुळे आकस्‍मिक मृत्‍यूचा धोका झाला कमी! ICMR चे नवे संशोधन appeared first on पुढारी.

Go to Source