राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबरला पुण्यात येणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 30 नोव्हेंबर रोजी शहरात येत आहेत. येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला (एएफएमसी) त्या भेट देणार आहेत. एनडीएच्या 145 व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा 30 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू शहरात येणार आहेत. एनडीएच्या संचलन सोहळ्यात त्या उपस्थित … The post राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबरला पुण्यात येणार appeared first on पुढारी.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबरला पुण्यात येणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 30 नोव्हेंबर रोजी शहरात येत आहेत. येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला (एएफएमसी) त्या भेट देणार आहेत. एनडीएच्या 145 व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा 30 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू शहरात येणार आहेत.
एनडीएच्या संचलन सोहळ्यात त्या उपस्थित राहतील. एनडीए ही लष्कराच्या तिन्ही दलांना एकत्रितपणे प्रशिक्षण देणारी देशासह जगातील आघाडीची प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेने आजवर तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविण्याबरोबरच मित्र देशांतील प्रशिक्षणार्थ्यांना देखील लष्करी प्रशिक्षण दिले आहे. 75 वर्षांची गौरवशाली वाटचाल साजरी करीत असताना यंदाचा एनडीएचा हा दीक्षान्त संचलन सोहळादेखील अत्यंत वेगळा होणार आहे.
तसेच येथील वैद्यकीय प्रशिक्षण संस्था असलेली एएफएमसीने देखील आपल्या स्थापनेचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा केला. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम पार पडले असून, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी एएफएमसीला ’प्रेसिडेंट्स कलर अ‍ॅवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे. त्यानिमित्त एएफएमसीमध्ये येत्या 1 डिसेंबर 2023 ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा
दुभाजकांवर रोपे का लावतात?
बुलेट ट्रेनपेक्षाही वेगवान बहिरी ससाणा!
77 हजार रुपयांचा टॉवेल स्कर्ट
The post राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबरला पुण्यात येणार appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 30 नोव्हेंबर रोजी शहरात येत आहेत. येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला (एएफएमसी) त्या भेट देणार आहेत. एनडीएच्या 145 व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा 30 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू शहरात येणार आहेत. एनडीएच्या संचलन सोहळ्यात त्या उपस्थित …

The post राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबरला पुण्यात येणार appeared first on पुढारी.

Go to Source