मनोज जरांगेंच्या जीवाला धोका; विषप्रयोगाची शक्यता!

पुढारी ऑनलाईन डेस्क : “मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विषप्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना औषध, सलाईन तपासून द्या,” असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. (Manoj Jarange Patil) २० तारखेपर्यंत सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, हैदराबाद गॅझेट स्वीकारा, शिंदे समितीची मुदत एक वर्ष वाढवा, आमच्यावर दाखल केलेले … The post मनोज जरांगेंच्या जीवाला धोका; विषप्रयोगाची शक्यता! appeared first on पुढारी.

मनोज जरांगेंच्या जीवाला धोका; विषप्रयोगाची शक्यता!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : “मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विषप्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना औषध, सलाईन तपासून द्या,” असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. (Manoj Jarange Patil)
२० तारखेपर्यंत सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, हैदराबाद गॅझेट स्वीकारा, शिंदे समितीची मुदत एक वर्ष वाढवा, आमच्यावर दाखल केलेले राज्यातील गुन्हे मागे घ्या हे सरकारला करावेच लागेल. तरच आंदोलन थांबेल. अन्यथा २० तारखेपासून पुढे सरकारने सरकारचे बघावे, आम्ही आमचे बघू असा गंभीर इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. तर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयात जे आरक्षण रद्द झाले, त्यातील सर्व त्रुटी लक्षात घेऊन मागास वर्ग आयोगाने सर्वेक्षणाचे काम केले आहे. यामुळे मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिकद़ृष्ट्या मागासलेपण या अहवालातून सिद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केला आहे.
Manoj Jarange Patil : काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“मनोज जरांगे पाटील यांचे ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे, त्यामुळे अनेक जणांना धक्का पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना दिली जाणारी औषधे, ज्यूस, जेवण तपासूनच द्यावे. शासन ही व्यवस्था करेल, अशी आशा बाळगतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : 

निलेश राणेंचा पुन्‍हा भास्‍कर जाधवांवर हल्‍लाबाेल, “त्‍यांचा स्‍वभाव…”
हिंगोली : आडगाव रंजे येथे मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन
चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा : वडेट्टीवार

Latest Marathi News मनोज जरांगेंच्या जीवाला धोका; विषप्रयोगाची शक्यता! Brought to You By : Bharat Live News Media.