हिंगोली : आडगाव रंजे येथे मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

आडगाव; रंजे पुढारी वृत्‍तसेवा वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (शनिवार) सकाळी दहा ते बारा या वेळेत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी परभणी हिंगोली रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालल्‍याचे दिसून येत आहे. यामध्ये गावोगावी उपोषण, आंदोलन, चक्काजाम आंदोलने करण्यात येत आहेत. मराठा योद्धा … The post हिंगोली : आडगाव रंजे येथे मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन appeared first on पुढारी.

हिंगोली : आडगाव रंजे येथे मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

आडगाव; रंजे Bharat Live News Media वृत्‍तसेवा वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (शनिवार) सकाळी दहा ते बारा या वेळेत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी परभणी हिंगोली रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालल्‍याचे दिसून येत आहे. यामध्ये गावोगावी उपोषण, आंदोलन, चक्काजाम आंदोलने करण्यात येत आहेत. मराठा योद्धा मनोज पाटील गेल्या आठ दिवसांपासून अंतरवाली येथे उपोषणाला बसले आहेत. परंतु सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही अशी भावना मराठा समाजामध्ये तयार होत आहे.
आडगाव येथील सर्व दुकाने आस्थापने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन पूर्णपणे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी हट्टा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्‍त ठेवला होता.
हेही वाचा : 

Delhi | दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम जवळील मंडप कोसळला, ८ जण जखमी, अनेकजण अडकल्याची भीती 
Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ४.४ तीव्रता

नांदेड : मराठा आंदोलन पेटले; आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाहनाची तोडफोड

Latest Marathi News हिंगोली : आडगाव रंजे येथे मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन Brought to You By : Bharat Live News Media.