धक्कादायक : फुटबॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फुटबॉल खेळत असताना बॉल झुडपात गेल्यानंतर ते शोधण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीपाठोपाठ जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलगी 28 आठवड्यांची गर्भवती राहिल्याने वानवडी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुकेश कुमार मुखीया (वय 22, कॉलनी, … The post धक्कादायक : फुटबॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार appeared first on पुढारी.

धक्कादायक : फुटबॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : फुटबॉल खेळत असताना बॉल झुडपात गेल्यानंतर ते शोधण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीपाठोपाठ जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलगी 28 आठवड्यांची गर्भवती राहिल्याने वानवडी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुकेश कुमार मुखीया (वय 22, कॉलनी, लुल्लानगर, वानवडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत घटनेच्या वेळी अल्पवयीन व सध्या अठरा वर्षाच्या असलेल्या तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहा महिन्यांपूर्वी पीडिता अल्पवयीन असताना ती मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना बॉल मैदानाशेजारील झुडपात गेला. त्या वेळी पीडिता बॉल शेाधण्यासाठी झुडपात गेली. त्या वेळी तेथे आलेला मुकेश तिच्या पाठोपाठ झुडपात गेला. तेथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान, पीडिता ही गर्भवती असल्याचा प्रकार तिच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये तिने मुकेश याने अत्याचार केल्याचे सांगितले. त्याने केलेल्या अत्याचारामुळे सध्या पीडिता ही 28 महिन्यांची गर्भवती असून, आरोपीवर बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार समोर आल्यानंतर 22 वर्षीय तरुणावर बलात्कार तसेच पॉस्कोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे वडील लष्करात नोकरीला असून, त्यांची बदली झाल्याने संपूर्ण कुटुंब बिहार येथे गेले आहे. तपास सुरू आहे.
– संजय पतंगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी ठाणे.

हेही वाचा

INSAT-3DS | हवामान उपग्रहाच्या प्रक्षेपणापूर्वी इस्रो प्रमुखांची मंदिरात प्रार्थना
नांदेड : मराठा आंदोलन पेटले; आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाहनाची तोडफोड
Nashik Kumbh Mela 2027 : सिंहस्थासाठी मनपा अंदाजपत्रकात अवघे दहा कोटी

Latest Marathi News धक्कादायक : फुटबॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार Brought to You By : Bharat Live News Media.