काम करतानाची काळजी
कीर्ती कदम
अनेकदा काम करता करता मान लचकते, पाठीत चमक भरते. पाय, कंबर दुखतात. या सगळ्यांचं कारण अयोग्य स्थितीत बसणं आहे. आजकाल आपल्या कामाचं स्वरूप अतिशय बदललेलं आहे. सतत बसून किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बघून काम करण्यामुळेही पाठीच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच योग्य स्थितीत बसा.
पाठीला व्यवस्थित आधार मिळेल, अशा खुर्चीत बसा. खुर्चीत बसल्यावर तुमचे तळपाय जमिनीला पूर्णपणे टेकले पाहिजेत. कॉम्प्युटर स्क्रीन तुमच्या डोळ्यांच्या पातळीवर असावी, जेणेकरून मानेच्या स्नायूंवर ताण पडणार नाही. खूप वेळ एकाच अवस्थेत बसणं टाळा. मध्ये थोडा वेळ व़िश्रांती घ्या किंवा फेर्या मारा. स्नायूंची हालचाल करून त्यांना थोडासा ताण द्या. जर तुम्ही संपूर्ण वेळ उभं राहून काम करत असाल तर मात्र काही वेळ आरामात बसण्यासाठी तुमच्या विश्रांंतीच्या वेळेचा वापर करा.
मानेत लचक भरण्याचं कारण असतं, अयोग्य अवस्थेत झोपणं. एका कुशीवर झोपताना काहीशा वाकवलेल्या गुडघ्यांमध्ये एक उशी ठेवल्यास पाठीचे दुखणे टाळता येते. पाठ टेकून झोपायचे असल्यास पायाखाली उशी ठेवल्यास शरीराची पातळी समांतर व्हायला मदत होते. पालथे (पोटावर) झोपल्याने कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत झोपणं टाळा. झोपण्याची गादी तुमच्या पाठीच्या कण्याला आधार देण्याइतकी योग्य कडक असावी. फोमच्या गादीवर झोपणं टाळा.
जास्त वजनामुळे शरीराच्या ठेवणीत फरक पडतो आणि पाठदुखीचा त्रास होतो. शरीराला न पेलवणार्या वजनामुळे पाठीचे अनेक त्रास होतात. सामानाच्या पिशव्या उचलताना पाठ दुखत असेल तर एकाच मोठ्या पिशवीत सगळं सामान भरण्यापेक्षा दोन लहान पिशव्यांमध्ये सामानाची विभागणी करावी. दोन्ही पिशव्यांत समान वजनाचे सामान भरल्याने त्या पिशव्या घेऊन चालताना शरीराचे संतुलन आपोआप होते आणि पाठीच्या कण्याला त्रास होत नाही.
दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकातील एक काम संपवून दुसरे सुरू करण्यापूर्वी थकवा जाणवत असला तर, दोन कामांमधल्या वेळात पुरेशी विश्रांती घेणं गरजेचं आहे. अशी विश्रांती घेतल्याने तुम्ही दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने राहू शकाल. कामाच्या दरम्यान घेतलेल्या बे्रकमुळे स्नायूंनादेखील पुरेसा आराम मिळतो.
The post काम करतानाची काळजी appeared first on पुढारी.
अनेकदा काम करता करता मान लचकते, पाठीत चमक भरते. पाय, कंबर दुखतात. या सगळ्यांचं कारण अयोग्य स्थितीत बसणं आहे. आजकाल आपल्या कामाचं स्वरूप अतिशय बदललेलं आहे. सतत बसून किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बघून काम करण्यामुळेही पाठीच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच योग्य स्थितीत बसा. पाठीला व्यवस्थित आधार मिळेल, अशा खुर्चीत बसा. खुर्चीत बसल्यावर तुमचे तळपाय …
The post काम करतानाची काळजी appeared first on पुढारी.