दुभाजकांवर रोपे का लावतात?
मेक्सिको : राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा महत्त्वाचे रस्ते, दोन्ही रस्त्यांनात्त्विभागणार्या दुभाजकांवर सर्रास छोटी-छोटी रोपे लावलेली दिसून येतात. आता आपल्याला प्रदूषण टाळण्यासाठी असे करतात, असेही वाटू शकते. यात काही प्रमाणात तथ्य देखील आहे. पण, याचे खरे उत्तर वेगळेच आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अशा ठिकाणी रस्ता उभारण्यापूर्वी पृष्ठभागावर काँक्रिट किंवा खडी टाकून जो रस्ता तयार केला जातो, त्यात पावसाचे पाणी आत झिरपणे जवळपास बंदच होते. त्याचे नुकसान टाळण्यासाठी रस्त्यांच्या मधोमध योग्य आकारात जागा करून तेथे झाडे वाढण्यायोग्य जमीन तयार केली जाते आणि दुभाजकात विविध प्रकारची छोटी रोपे लावली जातात. हिरव्या रंगातील झाडेरोपे डोळ्यांना थंडावा देतात.
याशिवाय, आणखी एक कारण म्हणजे अशा महामार्गांवर रात्रीच्या वेळी वेगवान गाड्यांचा प्रकाश थेट डोळ्यांवर पडू शकतो. यामुळे समोरील काही दिसणे जवळपास बंदच होऊ शकते. हे टाळण्यासाठी देखील अशी रचना केली जाते. यामुळे वाहन चालवताना अडचण येत नाही. तसेच, यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही मदतच होते.
तिसरे कारण म्हणजे, महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड असते आणि यातून निघणारा कार्बनडाय ऑक्साईड ही रोपे शोषून घेतात व ऑक्सिजन सोडत राहतात. यामुळे, प्रदूषण कमी होण्यास हातभार लागतो. याच ठिकाणी वाहतुकीबाबत सूचना देणारे फलक देखील लावले जातात. त्यामुळे हा देखील दुभाजकाचा आणखी एक फायदा होतो.
The post दुभाजकांवर रोपे का लावतात? appeared first on पुढारी.
मेक्सिको : राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा महत्त्वाचे रस्ते, दोन्ही रस्त्यांनात्त्विभागणार्या दुभाजकांवर सर्रास छोटी-छोटी रोपे लावलेली दिसून येतात. आता आपल्याला प्रदूषण टाळण्यासाठी असे करतात, असेही वाटू शकते. यात काही प्रमाणात तथ्य देखील आहे. पण, याचे खरे उत्तर वेगळेच आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अशा ठिकाणी रस्ता उभारण्यापूर्वी पृष्ठभागावर काँक्रिट किंवा खडी टाकून जो रस्ता तयार केला …
The post दुभाजकांवर रोपे का लावतात? appeared first on पुढारी.