धुळे जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्धघाटन

धुळे : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश संदिप स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतुन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन तयार करण्यात आले आहे. यासाठी आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब … The post धुळे जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्धघाटन appeared first on पुढारी.

धुळे जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्धघाटन

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश संदिप स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले.

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतुन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन तयार करण्यात आले आहे. यासाठी आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी बालस्नेही पोलीस स्टेशन तयार करण्यासाठी तात्काळ परवानगी दिल्यामुळे बालस्नेही पोलीस स्टेशन ही संकल्पना साकार करणे शक्य झाले. या उपक्रमाचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी कौतुक केले असुन या उपक्रमांस शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती उषा साळुंखे, बाल कल्याण समिती सदस्या सुरेखा पवार, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीष जाधव, परिवीक्षा अधिकारी पी.एस.कोकणी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण, संरक्षण अधिकारी ( संस्थात्मक ) तृप्ती पाटील, राज्य समन्वयक नंदु जाधव, जिल्हा समन्वयक श्रीकांत मोरे, सखी वन स्टॉप सेंटरच्या गायत्री भामरे, चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक प्रतिक्षा मगर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील आझादनगर पोलीस स्टेशन येथे हे पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन तयार करण्यात आले आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात येतांना बालकांना सुरक्षित व मनोरंजक वातावरण असावे यादृष्टीने जन साहस संस्था, इंदौर शाखा, धुळे यांच्या सौजन्याने आझादनगर पोलीस स्टेशनच्या तळमजल्यातील एका कक्षातील भिती बालस्नेही चित्रांनी रंगविण्यात आल्या आहेत. यामागचा उद्देश असा की बालकांची सर्वप्रथम सुरक्षितता जोपासली जावी, बालकांचे सर्वोत्तम हित जोपासल जावं, बालकांची सहभागिता अंगिकारली जावी, बालकांप्रती संवेदनशील व्यवस्था निर्माण केल्या जाव्यात बालकांना भयमुक्त वाटेल असे बातावरण निर्माण केलं जावे तसेच बाल स्नेही प्रक्रिया बाल न्याय व्यवस्थेमध्ये रुजवणं आणि सजवण ही आपल्या सर्वाची जबाबदारी आहे.
हेही वाचा :

Pune News : शिवजयंतीच्या तपपूर्ती सोहळ्याला ९५ स्वराज्यरथांची मानवंदना
Nashik Crime News : गुन्हेगारी कृत्य करणारे तीन सराईत हद्दपार, पोलिस उपआयुक्तांची कारवाई
Motion of Confidence: मुख्यमंत्री केजरीवाल उद्या विधानसभेत ‘विश्वासदर्शक’ ठराव मांडणार

Latest Marathi News धुळे जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्धघाटन Brought to You By : Bharat Live News Media.