सिंधुदुर्ग: परुळेबाजार ग्रा.पं.चा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान

वेंगुर्ले, पुढारी वृत्तसेवा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व ‘आर. आर. पाटील सुंदर गाव’ स्पर्धा यात परुळेबाजार ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम, द्वितीय, व स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळविले आहेत. याबद्दल ओरोस येथील कार्यक्रमात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, … The post सिंधुदुर्ग: परुळेबाजार ग्रा.पं.चा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान appeared first on पुढारी.

सिंधुदुर्ग: परुळेबाजार ग्रा.पं.चा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान

वेंगुर्ले, Bharat Live News Media वृत्तसेवा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व ‘आर. आर. पाटील सुंदर गाव’ स्पर्धा यात परुळेबाजार ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम, द्वितीय, व स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळविले आहेत. याबद्दल ओरोस येथील कार्यक्रमात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी सभापती निलेश सामंत यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुदवडकर, ग्रा.पं. सदस्य प्रदीप प्रभु, सीमा सावंत, प्राजक्ता पाटकर, स्वच्छ्ता कर्मचारी विश्राम चव्हाण, डाटा ऑपरेटर अश्विनी चव्हाण, ग्रा. प. कर्मचारी शंकर घोगळे आदी उपस्थित होते. यावेळी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. स्वच्छतादूत प्रेमा जाधव यांचा दिल्लीत झालेल्या सन्मानाबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कुशेवाडा ग्रामपंचायतीचा यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हेही वाचा 

सिंधुदुर्ग : डिगस- सुर्वेवाडी परिसरात गव्यांचा धुमाकूळ; पिकांची नासधूस
सिंधुदुर्ग : राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचा सन्मान
सिंधुदुर्ग : वेंगुर्ले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मंत्री दीपक केसरकर

Latest Marathi News सिंधुदुर्ग: परुळेबाजार ग्रा.पं.चा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान Brought to You By : Bharat Live News Media.