तरुणाला शेतात बोलवून केला खून, कारण गुलदस्त्यात

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – भुसावळ तालुक्यातील गोजोरे या गावात 27 वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. खून झालेल्या तरुणाचा मृतदेह जळगाव रुग्णालयात आहे. या तरुणाचा खून का झाला याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र पोलिसांनी खून झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे विनोद गंभीर कोळी (वय २७) आई वडील व दोन भावांसह शेतीवर उदरनिर्वाह करून गावात राहत होते. एका तरुणाला ४ ते ५ जणांनी घरातून शेतात बोलावून बेदम मारहाण करीत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १६) दुपारी १ रोजी घडली आहे. काही संशयितांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी त्याला भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. तेथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हलविण्यात आले. जळगाव येथील शासकीय रुग्णालयात त्याला तपासून वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषित केले.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पोलीस निरीक्षक बबन जगताप, एपिआय अमोल पवार यांच्यासह कर्मचारी जळगाव रुग्णालयात येत कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा रात्री उशिरा पर्यंत दाखल होईल. या घटनेबाबत डी. वाय एस. पी. कृष्णांत पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदरील गावात तरुणाचा खून झालेला आहे. आमचे अधिकारी व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :
Jalgaon News : जलशुद्धीकरण केंद्रात विजेच्या धक्क्याने अल्पवयीन कामगाराचा मृत्यू, 5 जण बचावले
Supriya Sule: आठवण आबांची, निशाणा मात्र सत्ताधारी सरकारवर; खासदार सुळे यांचे ट्विट चर्चेत
Jalgaon Crime News : बनावट देशी दारु बनविणाऱ्या कारखान्यावर छापा, 46 लाखांहुन अधिक मु्द्देमाल जप्त
Latest Marathi News तरुणाला शेतात बोलवून केला खून, कारण गुलदस्त्यात Brought to You By : Bharat Live News Media.
