बीड : माजलगाव येथील कुणाल जिनिंगला आग; १५ हजार क्विंटल कापूस जळून खाक

माजलगाव ; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहराजवळ असलेल्या फुले पिंपळगाव येथील कुणाल कापूस जिनिंगला आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीत १५ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना आज (दि.१६) दुपारी चारच्या सुमारास घडली. त्यानंतर माजलगाव अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यानंतर पाथरी मानवत येथील अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली.
माजलगाव शहराजवळ असलेल्या कुणाल कापूस जिनिंगला मशीनमध्ये झालेल्या स्पार्कने फायर होऊन आग लागली. या आगेने रौद्ररूप धारण केल्याने जिनिंगमध्ये असलेला जवळपास १५ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. माजलगाव अग्निशामन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आणण्यास अपयश आले. त्यानंतर बाजार समितीचे सचिव हरिभाऊ सोनवणे यांनी पाथरी मानवत येथील अग्निशामन दलाच्या गाड्याला पाचरण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा :
Motion of Confidence: मुख्यमंत्री केजरीवाल उद्या विधानसभेत ‘विश्वासदर्शक’ ठराव मांडणार
Supriya Sule: आठवण आबांची, निशाणा मात्र सत्ताधारी सरकारवर; खासदार सुळे यांचे ट्विट चर्चेत
Hingoli Maratha Andolan : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, खांडेगाव पाटी येथे बस पेटवली; शिरड-शहापूरजवळ बसेसवर दगडफेक
Latest Marathi News बीड : माजलगाव येथील कुणाल जिनिंगला आग; १५ हजार क्विंटल कापूस जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.
