किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात

नाते, Bharat Live News Media वृत्तसेवा: हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४२ वा राज्याभिषेक सोहळा आज (दि.१६) उत्साहात संपन्न झाला. शिवसेना उपनेते व महाड- पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड दिनोस्तव संभाजी महाराज समिती यांच्यामार्फत हा सोहळा साजरा करण्यात आला. Raigad
ढोल ताशांच्या गजरात छत्रपती संभाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढत होळीच्या माळापासून राज दरबारात आणण्यात आली. त्यानंतर संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर जलाभिषेक करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जय जयकाराने राज सदर दुमदुमून गेली. Raigad
ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याच धर्तीवर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा यापुढे साजरा केला जाईल. यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद व राज्य शासनाकडून भरीव आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही आमदार गोगावले यांनी दिली.
या राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाड, पोलादपूर तालुक्यातील माजी लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक शिवभक्त संघटनांचे प्रतिनिधी, कोकणकडा मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी आदीसह अबालवृद्ध शिवभक्तांनी उपस्थिती लावली होती.
हेही वाचा
रायगड : बलात्कार करून अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल
रायगड : कर्ज देतो सांगून एकाची तीन लाखाची फसवणूक
रायगड : खारघरमधील हायवे ब्रेक हॉटेल जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान
Latest Marathi News किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात Brought to You By : Bharat Live News Media.
