आठवण आबांची, निशाणा मात्र सत्ताधारी सरकारवर; खा. सुळेंचे ट्विट चर्चेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: स्वर्गीय आर. आर. पाटील यांची आज (दि.१६) पुण्यतिथी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे लाडके गृहमंत्री आर आर पाटील यांना जाऊन८ वर्षे झाली. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर्णी यांची कविता एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहे. लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी लिहलेल्या ‘आबा, आज तुम्ही असते तर’… यामधून सुळे यांनी आर आर पाटील यांच्या कारकिर्दीतील आठवणी शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. (Supriya Sule)
‘आबा, आज तुम्ही असते तर’…
(~हेरंब कुलकर्णी)
आबा तुम्हाला जाऊन अवघी ८ वर्षे झाली..पण आज तुम्ही असता तर हे बघवले असते का ? तुम्ही ज्यांना देव मानले, त्यांना ते ही देव मानतात पण देवाचा जयजयकार करत त्यांनी देव्हारा बदलला….
ज्या राज्यात तुम्ही गृहमंत्री होता,
तिथे… pic.twitter.com/UNuvvS1kbg
— Supriya Sule (@supriya_sule) February 16, 2024
देवाचा जयजयकार करत, त्यांनी देव्हारा बदलला- अजित पवारांवर टीका
तुम्ही ज्यांना देव मानवे, त्यांना तेही देव मानतात. पण देवाचा जयजयकार करत त्यांनी देव्हारा बदलला. अशी टीका कवितेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करण्यात आली आहे.
का नाही केले घाऊक पक्षांतर मुख्यमंत्री होण्यासाठी ?
तुम्हाला का नसेल वाटले ? जमवावी कोटींची माया पुढच्या पिढीच्या राजकारणासाठी ? तुम्ही का नाही केले घाऊक पक्षांतर मुख्यमंत्री होण्यासाठी ? अशी टीका देखील पक्ष फोडणाऱ्या आमदारांवर हेरंब कुलकर्णी यांच्या आर.आर. पाटील यांच्या ‘आबा, आज तुम्ही असते तर…’ या कवितेतून केली आहे.
हेही वाचा:
Sule vs Pawar : माझी कोणाशी वैयक्तिक लढाई नाही : खासदार सुळे
भाजपकडून जगदीश मुळीक आघाडीवर; शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा
राज्यसभेवर जाणारे सारेच कोट्यधीश; प्रफुल्ल पटेल सर्वाधिक श्रीमंत
Latest Marathi News आठवण आबांची, निशाणा मात्र सत्ताधारी सरकारवर; खा. सुळेंचे ट्विट चर्चेत Brought to You By : Bharat Live News Media.
