गोवा: ट्रकने दुचाकीला फरफटत नेले; दोन तरुणाचा जागीच मृत्यू

मडगाव, पुढारी वृत्तसेवा : राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. सांगेत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बालरथाला झालेल्या अपघाताचे प्रकरण ताजे असताना आज (दि.१६) दुपारी २ वाजता दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रस्त्याच्या हॉटमिक्ससाठी डांबर मिश्रीत खडी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ताबा सुटून सावर्डे येथील दोन जीवलग मित्र जागीच ठार झाले. ही घटना रालोय कुडतरी येथे … The post गोवा: ट्रकने दुचाकीला फरफटत नेले; दोन तरुणाचा जागीच मृत्यू appeared first on पुढारी.

गोवा: ट्रकने दुचाकीला फरफटत नेले; दोन तरुणाचा जागीच मृत्यू

मडगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. सांगेत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बालरथाला झालेल्या अपघाताचे प्रकरण ताजे असताना आज (दि.१६) दुपारी २ वाजता दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रस्त्याच्या हॉटमिक्ससाठी डांबर मिश्रीत खडी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ताबा सुटून सावर्डे येथील दोन जीवलग मित्र जागीच ठार झाले. ही घटना रालोय कुडतरी येथे घडली. तन्वेश नाईक (वय २१, टोनीनगर) आणि श्रीकर नाईक (वय १९, आनंदवाडी) अशी मृत तरुणाची नावे आहेत. ज्या ट्रकखाली चिरडून या दोन तरुणाचा बळी गेला. तो ट्रक मृत तन्वेश याच्या काकाचा आहे.
मृत श्रीकर हा सावर्डे पंचायतीचे माजी पंच निळखंट नाईक यांचा मुलगा आहे. सांतोण सावर्डे येथील हॉटमिक्स प्रकल्पातील डांबर मिश्रित खडी घेऊन जी ए ०२ यु,६७१७ क्रमांकाचा ट्रक चांदोर मार्गे मडगावात जात होता. तर एमपीटीतील कोळसा घेऊन अन्य एक ट्रक चांदोर मार्गे सावर्डेच्या दिशेने जात होता. दोन्ही ट्रक रालोय येथील अरुंद रस्त्यावर समोरासमोर आले असता कोळसावाहू ट्रकचे डिस्क (टायर) डांबराची वाहतूक करणाऱ्या डिस्कला घासले.
त्यामुळे गरम डांबराच्या वजनाने दाबल्या गेलेल्या त्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटला. मडगाववरून चांदोरच्या दिशेने येणाऱ्या मोटर सायकलला (जी ए ०२ क्यू ९७६४) धक्का देऊन तो ट्रक थेट शेतात जाऊन पडला. तर दुचाकीवरील तन्वेश आणि श्रीकर यांना ट्रकने दूर पर्यंत फरफटत नेल्याने त्यांचा रूग्णालयात नेण्यापूर्वी जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर स्थानिक शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शी फर्नांडीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरूण ट्रकच्या चाकाखाली चिरडले होते. दोघांचेही मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत शेतात पडले होते. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. मायणा कुडतरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा 

Goa Politics : गोव्यामध्ये INDIA आघाडीत फूट; द. गोव्यात काँग्रेस खासदार असताना ‘आप’ने जाहीर केला उमेदवार
Goa News | पणजी होणार भारतातील पहिले एलपीजी मुक्त शहर
Goa News : राजकीय आरक्षणासाठी आदिवासी समाजाचा मांडवी पुलावर रास्ता रोको

Latest Marathi News गोवा: ट्रकने दुचाकीला फरफटत नेले; दोन तरुणाचा जागीच मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.